जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / जिद्दीला सलाम! 10 वर्ष वेश्या व्यवसायात सोसले हाल, हिमतीनं बाहेर पडत उभारलं नवं आयुष्य, Video

जिद्दीला सलाम! 10 वर्ष वेश्या व्यवसायात सोसले हाल, हिमतीनं बाहेर पडत उभारलं नवं आयुष्य, Video

जिद्दीला सलाम! 10 वर्ष वेश्या व्यवसायात सोसले हाल, हिमतीनं बाहेर पडत उभारलं नवं आयुष्य, Video

या महिलेला नोकरीचं आमिष दाखवून मुंबईला आणलं आणि देहविक्रीच्या दलदलीत ढकलण्यात आलं होतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 2 मार्च :   मायानगरी मुंबईच्या रेडलाइट एरिया असलेल्या कामाठीपुरामध्ये दरवर्षी हजारो सेक्स वर्कर्स दाखल होतात. असते. महिला, लहान मुलींपासून ते कॉलेज गर्ल्सपर्यंत अनेकींना खोटी आश्वासने, आमिष दाखवून या व्यवसायात ओढले जाते. सेक्स वर्कर्सना या ठिकाणी रोज अत्याचारांचा सामना करावा लागतो. अनेक सेक्स वर्कर्सने आता हा व्यवसाय सोडला आहे. तर काही एनजीओंच्या मदतीने आपल्या मैत्रिणींचे आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं   आम्ही तुम्हाला एका अशाच महिलेबद्दल सांगणार आहोत. या महिलेला नोकरीचं आमिष दाखवून मुंबईला आणलं आणि देहविक्रीच्या दलदलीत ढकललं, पण आज ती शिलाई मशिनच्या मदतीनं स्वत:चं पोट भरत आहे. 15 व्या वर्षी मुंबईत आली आणि.. परिस्थितीवर मात करणाऱ्या या महिलेचं नाव मुस्कान असं आहे. मुस्कानला नोकरीचं आमिष दाखवून मुंबईला आणण्यात आलं होतं. त्यानंतर काही पैशांसाठी तिची कामाठीपुऱ्यातील कोठ्यावर विक्री करण्यात आलं. मुस्कान तेव्हा फक्त 15 वर्षांच्या होत्या. त्यांना तो प्रसंग आजही आठवतो. महिलांमध्ये होणारे हे आहेत कॉमन 6 आजार; त्याकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात मला 15 व्या वर्षी कोलकातावरून नोकरीसाठी मुंबईला आणण्यात आलं. त्यावेळी मी कामाठीपुरा पाहिलं. मला सुरुवातीला आपण कुठे आहोत? आपल्याला काय करायचं आहे? काही कळत नव्हतं. कामाठीपुरा पाहिल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मला जबरदस्तीनं हे काम करण्यास भाग पडले. तो जिवंतपणी नरकयातना भोगण्याचा अनुभव होता. मला सुरुवातीला मानसिक, शारीरिक त्रास देण्यात आला. मी या व्यवसायात काम करावं म्हणून मला धमक्या देण्यात आल्या. पळून जावं किंवा आत्महत्या करावी हे दोन पर्याय दिसत होते. पण, जिवंत राहण्यासाठी मला या क्षेत्रात सामावून घेऊन ही जेल स्वीकारावी लागली.'

    News18लोकमत
    News18लोकमत

    10 वर्षानंतर बदलली परिस्थिती ‘मी 10 वर्षांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रात काम केलं. मी मुंबईत येऊन फसले होते. मी परत जाऊ शकत नव्हते. शिक्षण झालेलं नव्हतं. लिहिता वाचता येत नव्हतं. घरची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. मी तरुण असेपर्यंत या क्षेत्रात काम करू शकत होते. वय झाल्यानंतर कामाठीपुरा सोडावाच लागणार होता. या संकटाच्या परिस्थितीमध्ये ‘अपने आप वुमेन्स कलेक्टीव्ह’ या संस्थेबद्दल माहिती मिळाली. या संस्थेतील पूनम अवस्थी आणि मंजू व्यास यांच्या संपर्कात आले. त्यावेळी शिलाई मशिन बद्दल माहिती मिळाली. माझं आयुष्य बदललं,’ असं मुस्कान यांनी सांगितलं. चेंजमेकर महिला: वयाच्या 16 व्या वर्षी लग्न, मग 21 व्या वर्षी देशातील पहिली महिला पायलटचा परवाना मुस्कान सुरूवातीला शिलाई मशीन चालवायला घाबरत असे. मात्र प्रशिक्षण घेऊन तिनं स्वत:चं फाटलेलं आयुष्य पुन्हा नव्यानं शिवायला सुरूवात केली. आज ती लहान मुलांचे कपडे, कापडी पिशव्या या गोष्टी तयार करुन विकते. त्यासोबतच तिच्या सारख्या अनेक महिलांना दलदलीतून बाहेर काढण्याचाही प्रयत्न करत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात