जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / International Women's Day: महिलांमध्ये होणारे हे आहेत कॉमन 6 आजार; त्याकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

International Women's Day: महिलांमध्ये होणारे हे आहेत कॉमन 6 आजार; त्याकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

International Women's Day: महिलांमध्ये होणारे हे आहेत कॉमन 6 आजार; त्याकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Common Diseases in Women: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांनी त्यांच्या आरोग्य आणि निरोगीपणाला प्राधान्य देण्याची खरी गरज आहे. महिलांवर असणाऱ्या विविध जबाबदाऱ्यांमुळे त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 08 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांनी त्यांच्या आरोग्य आणि निरोगीपणाला प्राधान्य देण्याची खरी गरज आहे. महिलांवर असणाऱ्या विविध जबाबदाऱ्यांमुळे त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आरोग्य-संबंधित अनेक व्याधीही होण्यास सुरुवात होते. मात्र, त्याकडंही पुरेशा प्रमाणात लक्ष दिलं जात नाही. यामध्ये जागरूकता नसणं, उशिरा निदान होणं किंवा आजाराचं चुकीचं निदान या गोष्टींचा समावेश आहे. यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात येतं. त्यामुळे स्त्रियांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक (common health problems in women) बनले आहे. गर्भधारणा मधुमेह गर्भधारणेदरम्यान स्त्रियांमध्ये रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त असते, त्यामुळे हा त्रास उद्भवतो. गरोदरपणातील मधुमेहासाठी त्या काळात आपला आहार आणि जीवनशैली व्यवस्थापित करणे अत्यावश्यक आहे. ज्या महिलांना जीडी आहे, त्यांना त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीचे सतत निरीक्षण केल्याने फायदा होतो. या जोखीम घटकांची काळजी घेतल्यास पुढील गुंतागुंती टाळल्या जाऊ शकतात, ज्यामुळे आई आणि बाळाला त्रास होत नाही. ज्योतिदेव डायबेटिस रिसर्च सेंटर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. ज्योतिदेव केशवदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुमेहींनी ग्लुकोजच्या पातळीचे निरीक्षण करणे, जीवनशैलीत बदल करणे खूप महत्त्वाचे आहे. ताणतणाव, आहार आणि व्यायाम यांचा शरीरावर कसा परिणाम होतो हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. वयाशी संबंधित मॅक्युलर डीजनरेशन वयाशी संबंधित मॅक्युलर डिजनरेशनमुळे (Age-Related Macular Degeneration) डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते. ज्यामुळे रेटिनाच्या एकूण कार्यावर परिणाम होतो. वैद्यकीय तज्ज्ञांना असं आढळून आलं आहे की, 66 टक्के पेक्षा जास्त AMD प्रकरणे महिलांमध्ये दिसतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, महिलांच्या शरीरात चक्रीय हार्मोनल बदल त्यांच्यामध्ये एएमडीच्या अधिक प्रकरणांमुळे होतात. इनसाइट व्हिजन फाऊंडेशनचे वैद्यकीय संचालक डॉ. नितीन प्रभुदेसाई यांनी सांगितलं की, AMD साठी जोखीम घटक म्हणून महिलांमध्ये अनुवांशिक आणि हार्मोनल समस्या कॉमन आहेत. निरोगी जीवनशैली जगणाऱ्या आणि वयाच्या 50 नंतर नियमित डोळ्यांची तपासणी करणाऱ्या महिलांमध्ये AMD लवकर आढळून येते. त्यावर उपचार करण्यात मदत होऊ शकते. मॅक्युलर कमी होत गेल्यामुळं अंधत्व येऊ शकते. ankylosing spondylitis अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस (Ankylosing spondylitis) हा वेदना होण्याचा एक जुनाट आजार आहे. ज्यामुळे वर्टिब्रेटमध्ये तीव्र जळजळ होऊ शकते. जरी पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही या रोगाचा त्रास होतो, परंतु महिलांना पुरुषांपेक्षा भिन्न लक्षणे जाणवतात. साधारणपणे, या प्रकाराला सामान्य पाठदुखी म्हणून पाहिलं जातं. मात्र, डॉ. प्रदीप कुमार सरमा, वरिष्ठ संधिवात सल्लागार, एक्सेल केअर हॉस्पिटल (गुवाहाटी) म्हणतात. अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस असलेल्या महिलांचे अनेकदा चुकीचे निदान होते, त्यामुळे पुढील अडचणी वाढत जातात. AS मुळे स्त्रियांच्या झोपेच्या चक्रावर परिणाम होतो. यामुळे रात्रीच्या वेळी पाठदुखी होते, कार्यात्मक परिणाम वाढतात. एएस असलेल्या महिलांमध्ये हार्मोनल, इम्यूनोलॉजिकल आणि अनुवांशिक घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना छातीत, पाठीच्या वरच्या भागात आणि पेरीफेरल सांध्यामध्ये तीव्र वेदना होतात. स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग स्त्रियांमध्ये जास्तीत-जास्त स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो. स्तनांमध्ये गाठी, सूज, वेदना इत्यादी स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. त्याची लक्षणे ओळखून सुरुवातीला उपचार केले नाहीत तर ते प्राणघातक ठरते. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्याबाबतीतही असेच दिसून येते. या दोन कॅन्सरमुळे महिलांमध्ये जास्त मृत्यू होतात. हे वाचा -  कोरोनानंतर Heart Rate वाढण्याचा त्रास हलक्यात नका घेऊ; वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा PCOS महिलांमध्ये पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम अधिक सामान्य आहे. हा एक चयापचय विकार आहे, ज्यामुळे हार्मोन्स असंतुलित होतात. यामध्ये पुरुष संप्रेरक एंड्रोजनचे प्रमाण जास्त असते. यामुळे, अंडाशयात लहान ग्रंथी तयार होतात. यालाच पॉलीसिस्टिक अंडाशय म्हणतात. इन्सुलिनचा अतिरेक, इंफ्लेमेशन, आनुवंशिकता इत्यादींमुळे (common health problems in women) हा आजार वाढतो. हे वाचा -  केसांवर घरगुती उपाय करताना तुम्हीही अशी चूक करत नाही ना?कोंड्यानं डोकं भरून जाईल एनीमिया (Anemia) देशातील बहुतांश महिला अशक्तपणाने त्रस्त असल्याचे आढळून आले आहे. स्त्रिया आपल्या घर-ऑफिसच्या कामात इतक्या व्यग्र असतात की अनेकदा त्या स्वतःच्या जेवणाकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते. गरोदरपणात अशक्तपणामुळे आई आणि मूल दोघेही कुपोषणाला बळी पडतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात