जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Women's Day 2023 : मुंबईतील 'या' रेल्वे स्टेशनवर महिलाराज, सर्व कारभार आहे स्त्रियांच्या हाती! Video

Women's Day 2023 : मुंबईतील 'या' रेल्वे स्टेशनवर महिलाराज, सर्व कारभार आहे स्त्रियांच्या हाती! Video

Women's Day 2023 : मुंबईतील 'या' रेल्वे स्टेशनवर महिलाराज, सर्व कारभार आहे स्त्रियांच्या हाती! Video

Women’s Day 2023 : मध्य रेल्वेवरील नेहमी गजबज असणाऱ्या या रेल्वे स्टेशनचा संपूर्ण कारभार महिला चालवतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 8 मार्च : जगभरात प्रत्येक क्षेत्रात आता महिलांनी प्रवेश मिळवला आहे. यापूर्वी फक्त पुरुषांसाठी समजल्या जाणाऱ्या काही क्षेत्रातही महिलांनी यशस्वी शिरकाव केला असून तिथंही ठसा उमटवलाय. काही क्षेत्रांमध्ये तर महिलांनी त्यांच्या कामानं आपली मक्तेदारी निर्माण केली आहे. जगभरात आपल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी धडपडणाऱ्या, आपल्या कुटुंबासाठी सर्व प्रकारचे त्रास सहन करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या विकासातही महिला शक्तीचा मोठा वाटा आहे. मध्य रेल्वेवरील नेहमी  गजबज असणाऱ्या माटुंगा रेल्वे स्टेशनचा सर्व कारभार महिलाच करतात. माटुंग्यात महिलाराज! तिकीट वाटपाचे काम असो की माटुंगा रेल्वे स्थानकावरील गाड्या चालवणे, सर्व कामे महिला करतात. स्थानकाच्या स्वच्छतेची जबाबदारीही महिलांच्या हाती आहे. महिला कर्मचाऱ्यांमुळे विशेषत: महिला प्रवाशांना या स्थानकात सुरक्षितता वाटते. येथे कार्यरत 38 महिला कर्मचाऱ्यांपैकी महिला ऑपरेशन्स, कमर्शियल विभागात, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, तिकीट तपासणी, उद्घोषक, संरक्षण कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे येथील स्टेशन प्रबंधक देखील एक महिला आहे. मध्य रेल्वेवरील फक्त महिलांकडून कारभार चालविला जाणारं माटुंगा हे पहिलं रेल्वे स्टेशन आहे. स्टेशन प्रबंधक मीना शंकर सेंटी यांनी या कारभाराबद्दल आपला अनुभव सांगितला आहे. ’ संपूर्ण महिलांकडून चालवणाऱ्या जाणाऱ्या स्टेशनमध्ये काम करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. 2017 साली ही जबाबदारी आम्हाला मिळाली. त्यानंतर गेली 6 वर्ष आम्ही ती व्यवस्थित सांभाळत आहोत. लातूरमधील ‘या’ गावात महिलाराज; स्त्रियांच्या हाती आहे संपूर्ण कारभार, Video ‘या स्टेशनवर यापूर्वी महिला आणि पुरुष दोघेही काम करत होते. मात्र 2017 साली जीएम शर्मा साहेबांनी संपूर्ण महिला स्टेशनची संकल्पना मांडली. आम्ही करत असलेल्या कामाबद्दल आम्हाला डीआरएम पुरस्कार देखील मिळाला आहे,’ असं तिकीट प्रबंधक नीता यांनी सांगितलं. महिलांमुळे बदललं चित्र ‘16 ऑक्टोंबर 1999 रोजी माटुंगा स्थानकावर सफाई कर्मचारी म्हणून रुजू झालेल्या अर्चना माने गेल्या 24 वर्षांपासून या स्टेशनवर काम करत आहे. त्यांनी अनेक स्टेशन मास्टर पाहिले आहे. मात्र महिलांच्या हातात स्टेशनची जबाबदारी आल्यापासून या स्टेशनची प्रगती झाली आहे. स्वच्छतेपासून प्रत्येक गोष्ट इथं महिला पाहातात,’ याचा आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं. आठवीत लग्न, 8 विषयात एम.ए. अन् डॉक्टरेट! विदर्भाच्या सुनेचा प्रवास पाहून वाटेल अभिमान, Video ‘गेल्या पाच वर्षांपासून त्या माटुंगा स्थानकावर कार्यरत आहे. त्यांच्या सोबत 8 महिला टीसी म्हणून कार्यरत आहेत. आज पर्यंत कोणाचीही तक्रार आली नाही. आम्हाला इथे काम करताना अगदी आनंद होतो. यापुढे सुद्धा असच काम करत राहू अशी अपेक्षा आहे,’ असं तिकीट तपासक अस्मिता मांजरेकर यांनी सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात