मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai: इन्स्टाग्रामवरील मित्राने केला घात; अश्लील चित्रण करत तरुणीकडून उकळले 58 हजार रुपये

Mumbai: इन्स्टाग्रामवरील मित्राने केला घात; अश्लील चित्रण करत तरुणीकडून उकळले 58 हजार रुपये

अर्धनग्न फोटो (Half naked photos) सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी (Threat to viral) देत एका तरुणानं मुंबईतील अल्पवयीन मुलीकडून तब्बल 58 हजार रुपये उकळले आहेत.

अर्धनग्न फोटो (Half naked photos) सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी (Threat to viral) देत एका तरुणानं मुंबईतील अल्पवयीन मुलीकडून तब्बल 58 हजार रुपये उकळले आहेत.

अर्धनग्न फोटो (Half naked photos) सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी (Threat to viral) देत एका तरुणानं मुंबईतील अल्पवयीन मुलीकडून तब्बल 58 हजार रुपये उकळले आहेत.

मुंबई, 06 ऑगस्ट: अर्धनग्न फोटो (Half naked photos) सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी (Threat to viral) देत एका तरुणानं मुंबईतील अल्पवयीन मुलीकडून तब्बल 58 हजार रुपये उकळले आहेत. ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला पैसे देण्यासाठी पीडित मुलीनं आपल्या घरातील दागिने चोरून विकले आहे. घरातील दागिने गायब असल्याचं पालकांना कळल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं अल्पवयीन पीडित मुलीकडून तब्बल 58 हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

संजय ओव्हाळ असं अटक केलेल्या 23 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपी तरुण हा मुळचा उस्मानाबाद येथील रहिवासी आहे. तर पीडित 17 वर्षीय मुलगी मुंबईतील कुरार परिसरातील रहिवासी असून ती इयत्ता बारावीच्या वर्गात शिकते. आरोपी ओव्हाळ हा मालवाहक टेम्पोवर वाहनचालक म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वी आरोपीची पीडितेशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. यानंतर त्यांच्यात संवाद वाढत जाऊन चांगली मैत्री झाली होती.

हेही वाचा-15वर्षांवरील वयाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणं बलात्कार? हाय कोर्टाचा निर्णय

दरम्यान, एकेदिवशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना आरोपीनं पीडित मुलीला अर्धनग्न होण्यास भाग पाडलं. कंपडे नाही काढले तर चाकूनं माझं काहीतरी बरं वाईट करेल, अशी धमकी आरोपीनं पीडितेला दिली. त्यामुळे पीडित मुलीनं आरोपीसमोर अर्धनग्न झाली. पण आरोपीनं गुपचूप ही घटना आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली. यानंतर आरोपीनं संबंधित अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, मुलीकडे दहा हजार रुपयांची मागणी केली.

हेही वाचा-पुणे: मेडिकलमधून कंडोम आणून न दिल्यानं तरुणाची सटकली; अल्पवयीन मुलावर चाकूनं वार

पीडित मुलीनं सुरुवातीला आरोपी संजय ओव्हाळला दहा हजार रुपये दिले. पण त्यानंतरही आरोपीनं तिला त्रास देणं सुरूच ठेवलं. त्याने पुन्हा आणखी पैशांची मागणी केली. एवढे सारे पैसे कुठून द्यायचे म्हणून पीडित मुलीनं घरातील दागिने चोरी करून आरोपीला तब्बल 58 हजार रुपये दिले. दरम्यान घरातील सोन्याचे दागिने सापडत नसल्यानं आईनं पीडितेकडे विचारपूस केली. यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. यानंतर पीडित मुलीच्या आईनं कुरार पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी संजय ओव्हाळ विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Mumbai