मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

महाराष्ट्रात कोरोनाचा 'ताप'; 9 जिल्ह्यांनी वाढवलं मोदी सरकारचं टेन्शन

महाराष्ट्रात कोरोनाचा 'ताप'; 9 जिल्ह्यांनी वाढवलं मोदी सरकारचं टेन्शन

Top ten districts where coronavirus is concentrated : सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेले देशातील 10 पैकी 9 जिल्हे एकट्या महाराष्ट्रातच आहेत

Top ten districts where coronavirus is concentrated : सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेले देशातील 10 पैकी 9 जिल्हे एकट्या महाराष्ट्रातच आहेत

Top ten districts where coronavirus is concentrated : सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेले देशातील 10 पैकी 9 जिल्हे एकट्या महाराष्ट्रातच आहेत

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 24 मार्च : भारतातील सर्वाधिक कोरोना प्रकरणं महाराष्ट्रात (Coronavirus in Maharashtra) आहेत. देशातील सर्वाधिक कोरोना प्रकरणं असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त जिल्हे हे महाराष्ट्रातीलच आहेत. सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या देशातील 10 पैकी 9 जिल्हे एकट्या महाराष्ट्रातच आहेत (Top Ten districts where coronavirus is concentrated). म्हणजे जवळपास एक चतुर्थांश भाग कोरोनाने व्यापला आहे. महाराष्ट्रानेच मोदी सरकारचं टेन्शन वाढवलं आहे.

केंद्र सरकारने देशातील अशा दहा जिल्ह्यांची यादी जारी केली आहे, जिथे कोरोनाची सर्वात जास्त प्रकरणं आहेत. यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील जिल्हे आहेत. दहापैकी नऊ जिल्हे तर फक्त महाराष्ट्रातीलच आहेत तर कर्नाटकातील फक्त एका जिल्ह्याचा समावेश आहे.

सर्वाधिक कोरोना केसेसे असलेले देशातील 10 जिल्हे

पुणे

नागपूर

मुंबई

ठाणे

नाशिक

औरंगाबाद

बंगळुरू शहर (कर्नाटक)

नांदेड

जळगाव

अकोला

हे वाचा - Pune Holi Guidelines: यंदाही पुण्यात होळी, धुळवडीवर निर्बंध; पालिकेची नियमावली

महाराष्ट्रात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे आणि नाशिक हे टॉपमध्ये आहेत. याच जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. शिवाय देशात दोन राज्यांनीच चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रासह पंजाब राज्यांमध्येही कोरोनाची सर्वात जास्त रुग्ण आहेत. या दोन्ही राज्यांतील टॉप पाच जिल्ह्यांचा विचार करताही पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे आणि नाशिक हे टॉपवर आहेत.

कोरोनाचा वाढता प्रभाव बघून, केंद्र सरकारने लॉकडाऊन बाबत नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. 1 एप्रिल ते 31 एप्रिल पर्यंत हे नियम लागू करण्यात येणार आहेत. गृहमंत्रालयाने नवीन निवेदन जाहीर केलं आहे.

हे वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात Double Mutant Variant; काय आहे हा प्रकार?

यात कोरोनाशी लढण्यासाठी उपाय करण्याचा हक्क स्थानिक प्रशासनाला देण्यात यावा असं म्हटलं आहे. म्हणजे आत्ता स्थानिक, जिल्हा किंवा तालुका पातळीवर लॉकडाऊन होऊ शकतं . आत्ता तर लॉकडाऊन झालं तर कोणत्याही प्रमाणात प्रवासाचे निर्बंध नसतील. या लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची जिल्हा बंदी नसणार आहे. राज्या-राज्यामधील प्रवासी वाहतूक सुरु राहील.आत्ता कोणत्याही व्यवहारांवर बंदी घालण्यात येणार नाही. मात्र आवश्यक ते निर्बंध असणार आहेत. SOP चं पालन करून व्यवहार चालू ठेवण्यात येतील.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Covid-19, Maharashtra, Mumbai