मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune Holi Guidelines: यंदाही पुण्यात Holi, धुळवडीवर निर्बंध; पालिकेने जारी केली नियमावली

Pune Holi Guidelines: यंदाही पुण्यात Holi, धुळवडीवर निर्बंध; पालिकेने जारी केली नियमावली

Pune Holi Latest Update: -यंदाही होळी, धुळवडीवर निर्बंध आल्याने सलग दुसऱ्या वर्षी पुणेकरांचा बेरंग झाला आहे.

Pune Holi Latest Update: -यंदाही होळी, धुळवडीवर निर्बंध आल्याने सलग दुसऱ्या वर्षी पुणेकरांचा बेरंग झाला आहे.

Pune Holi Latest Update: -यंदाही होळी, धुळवडीवर निर्बंध आल्याने सलग दुसऱ्या वर्षी पुणेकरांचा बेरंग झाला आहे.

  पुणे, 24 मार्च : राज्यात कोरोनाने थैमान घातले असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. येत्या रविवारी 28 मार्च रोजी होळी सण आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी येणारी धुळवड हे दोन्ही सण वाढत्या कोरोनामुळे पुणेकरांना साजरे करण्यावर पालिकेने बंदी घातली आहे.

  आज लॉकडाऊनला वर्षपूर्ती झाली असून राज्यातील बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. मुंबईसह पुण्यात होळी व धुळवड साजरी करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहे. राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहत यंदाही पुणेकरांच्या धुळवडीचा बेरंग झाला आहे.

  दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश, चंदीगड, बिहार, गुजरात आणि ओडिसा या भागात भागात होळीसंदर्भातील नियमावली जारी केली आहे.

  पुणे पालिकेने जारी केली होळीसंदर्भातील नियमावली

  -पुणे पालिकेने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केलं असून यानुसार सार्वजनिक ठिकाणी म्हणजे हॉटेल, रिसॉर्ट तसंच मैदाने, मोकळ्या जागा अशा कोणत्याही ठिकाणी होळी पेटवता येणार नाही आणि रंग उडवता येणार नाही.

  -हा सण वैयक्तिकरित्याही साजरा करता येणार नाही असेही पत्रकात नमूद केलं आहे

  -उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल असंही पत्रकात म्हटलं आहे

  -गेल्या वर्षी 9 मार्च म्हणजे होळीच्या दिवशीच पुण्यात आणि राज्यातही पहिला कोरोना रुग्ण सापडला होता.

  -यंदाही होळी, धुळवडीवर निर्बंध आल्याने सलग दुसऱ्या वर्षी पुणेकरांचा बेरंग झाला आहे.

  पुण्यात कोरोनाचा धोका

  पुणे - 17 मार्च - 2,587 नवे कोरोना रुग्ण

  पुणे- 18 मार्च - 2,752 नवे कोरोना रुग्ण

  पुणे - 19 मार्च - 2,834 नवे कोरोना रुग्ण

  पुणे - 20 मार्च - 3,111 नवे कोरोना रुग्ण

  पुणे- 21 मार्च - 2,900 नवे कोरोना रुग्ण

  पुणे - 22 मार्च - 2,342 नवे कोरोना रुग्ण

  पुणे - 23 मार्च - 3, 145 नवे कोरोना रुग्ण

  पुणे-24 मार्च-3098 नवे कोरोना रुग्ण

  First published:
  top videos

   Tags: Holi 2021, Maharashtra, Mumbai, Pune, Pune news, Strict rules and regulations