जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत कॅन्सरग्रस्त वडिलांना घेऊन मुलाने आईसह केला बाईकवर 25 किमी प्रवास

मुंबईत कॅन्सरग्रस्त वडिलांना घेऊन मुलाने आईसह केला बाईकवर 25 किमी प्रवास

मुंबईत कॅन्सरग्रस्त वडिलांना घेऊन मुलाने आईसह केला बाईकवर 25 किमी प्रवास

त्या तिघांना मुलूंड ते भिवंडी असा 25 किमीचा जीवघेणा प्रवास करावा लागला, मात्र कुणालाही पाझर फुटला नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

भिवंडी 11 एप्रिल: कोरोनामुळे लॉकडाऊन झालं आणि सगळे व्यवहार ठप्पा झाले. या काळात रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे एका मुलाला आपल्या कॅन्सरग्रस्त वडिलांना बाईकवर घेऊन प्रवास करावा लागला. त्या बाईकवर त्याची आईसुद्धा होती. मुंलूंड ते भिवंडी असा 25 किमीचा जीवघेणा प्रवास त्यांनी केला. मात्र कुणालाही पाझर फुटला नाही. भिवंडीतील पद्मानगर इथं  राहणारे विरस्वामी कोंडा याना तोंडाचा कॅन्सर झाला होता. त्यांच्यावर मुलूंडमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. आज (11एप्रिल) त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. दवाखण्याचा दररोज वाढणारा खर्चामुळे त्याने तातडीने घरी जाण्याचा निर्णय घेतला. पण प्रयत्न करूनही त्याला रुग्णवाहिका मिळाली नाही. शेवटी त्या मुलाने आपल्या बाईकवरच मुलूंडहून भिवंडीला जाण्याचा निर्णय घेतला. मुलगा बाईक चालवत होता. कॅन्सरग्रस्त वडिलांना त्याने मध्ये बसवलं आणि मुलाच्या आई आपल्या पतीला सांभाळत बाईकवर बसली. वडिलांच्या नाकात अन्नासाठी नळीही टाकण्यात आली होती. अशा परिस्थिती ते तिघही मुलूंडवरून भिवंडीसाठी ट्रिपल सीट निघाले. Corona : भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झालंय? WHO ने चूक मान्य करत म्हटलं… या प्रवासा दरम्यान ठिकठिकाणी पोलिसांनी अडवलं पण नाकात नळी लावलेला रुग्ण दिसल्यावर जाऊ दिले पण कोणीही  रुग्णवाहिका अथवा वाहनांची व्यवस्था करून दिली नाही. ते ट्रिपल शीट   कसेबसे रात्री  भिवंडी शहरात दाखल झाले. …तर लॉकडाऊन वाढेल कोरोनाचा महाराष्ट्रात प्रकोप वाढत आहे. लॉकडाऊनही वाढविण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले देशातच कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन देशात ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे कोरोनाच्या रेड झोनमध्येच असतील. तिथे लॉकडाऊनचं कठोरपणे पालन करावं लागेल. हे पालन योग्य पद्धतीने झालं नाही तर लॉकडाऊन आणखी वाढवावा लागेल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. मेट्रो सिटींमध्ये त्याचं योग्य प्रकारे पालन होत नाही असंही ते म्हणाले. मुंबईकरांनो सावधान! आणखी 11 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू तर 189 रुग्ण पॉझिटिव्ह महाराष्ट्रात तीन प्रकारचे रुग्णालये असणार आहेत. सोम्य, मध्यम आणि तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांना त्या त्या प्रमाणात तिथे दाखल केलं जाणार आहे.  मुंबई, ठाणे आणि पुणे हे रेड झोनमध्ये राहणार आहे. कारण एकूण रुग्णांमध्ये 91 टक्के हे याच भागात आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीत. महाराष्ट्रात पूल टेस्टिंग होणार असल्याचंही त्यांना सांगितलं. महाराष्ट्रातही त्यासंदर्भात काही नियम घालून दिले जाणार आहेत. ग्रीन झोनमध्ये असलेल्या भागात लॉकइनमध्ये राहून उद्योग आणि शेतीची कामे सुरू करण्यासाठी विचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात