मुंबई, 11 एप्रिल : देशात कोरोनाच्या रुग्णाचीं सख्या वाढत चालली आहे. राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान महाराष्ट्रात मुंबईत सर्वाधिक रुग्ण असून आज 189 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 11 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. या अकरापैकी तिघांचा मृत्यू गेल्या चार दिवसांत झाला असल्याची माहिती आहे. मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1182 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे 75 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दोन रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये आणि संशयितांमध्ये वाढ होत आहे. आज दिवसभरात 293 संशयित रुग्ण दाखल कऱण्यात आलं आहे. ठाण्यातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण 41 कोरोनाचे रुग्ण सापडले असून शनिवारी दिवसभरात तीन रुग्ण आढळले. यात पहिल्यांदाच दिवा भागात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, रुग्णांची संख्या वाढलेली असली तरी सर्वात जास्त टेस्ट इथं होतायत. ३३ हजार टेस्ट केल्या आहेत. तसंच ७० टक्के पॉजिटिव्ह रूग्ण हे लक्षणे नसलेली आहेत ही जमेची बाजू आहे. २५ टक्के सौम्य लक्षणे आहेत तर ५ टक्के क्रिटीकल असल्याची माहिती त्यांनी दिली.
भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 7 हजारांच्या वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 40 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत आहे. देशातील 7 हजार 400 रुग्णांपैकी 1,666 रुग्ण हे महाराष्ट्रातले आहेत. हे वाचा : कोरोनाचा कहर! भारतातल्या या शहरात मृत्यूआधीच कबरींसाठी खोदकामाला सुरुवात गेल्या 12 तासांत महाराष्ट्रात 92 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. त्यात फक्त मुंबईतील 72 जणांचा समावेश आहे. याशिवाय औरंगाबादमध्ये 2, मालेगावमध्ये 5, पनवेलमध्ये २, केडीएमसीमध्ये 1, ठाण्यात 4, पालघरमध्ये 1, नाशिक शहरात 1 , पुण्यात 1, अहमदनगरमध्ये 1 आणि वसईत 1 असे रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी मुंबईत रुग्णांची संख्या 1008 होती. तर मृतांचा आकडा 64 वर पोहोचला होता. हे वाचा : एप्रिलमध्ये वाढला कोरोनाचा वेग, वाचा गेल्या 15 दिवसातली धक्कादायक आकडेवारी संपादन - सुरज यादव