Home /News /mumbai /

मुंबईत नाल्यात 2 घरं कोसळली, दीड वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला, दोघी बेपत्ता

मुंबईत नाल्यात 2 घरं कोसळली, दीड वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला, दोघी बेपत्ता

सांताक्रुझमधील वाकोल्या परिसरात आज दुपारी नाल्याला लागून असलेली दोन घरं अचानक नाल्यात कोसळली.

    मुंबई, 04 ऑगस्ट : गेल्या 24 तासांपासून मुंबईत धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सांताक्रुझ भागात नाल्याला लागून असलेली 2 घरं कोसळली आहे. या दुर्घटनेत 1 महिला आणि 3 मुली नाल्यात पडल्या आहे. एका मुलीला वाचवण्यात यश आले आहे. तर दोन तासांच्या प्रयत्नानंतर जान्हवी काकडे नावाच्या दीड वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे तर नदी नाल्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.  सांताक्रुझमधील वाकोल्या परिसरात आज दुपारी नाल्याला लागून असलेली दोन घरं अचानक नाल्यात कोसळली. जोरदार झालेल्या पावसामुळे या घराच्या खालचा भाग  हा ढासाळला होता आणि त्यानंतर हे घर पडले. घरात राहणारी एक महिला आणि 3 मुली नाल्यात पडल्या. यात एका दोन वर्षांच्या मुलीला स्थानिकांनी वाचवलं. मात्र 16 वर्षाची मुलगी, 1 वर्षांची मुलगी आणि एक महिला अशा तिघांचा शोध सुरू आहे. संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास दीड वर्षांच्या मुलीचा मृतदेह घराच्या ढिगारा खालून बाहेर काढण्यात आला आहे. जान्हवी काकडे असं या मुलीचे नाव आहे. घराच्या कोसळलेल्या मलब्या खाली या मुलीचा अडकून मृत्यू झाला. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे जवान बेपता असलेल्या मुलीचा आणि महिलेचा शोध घेत आहे. तर जखमी मुलीला विन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाण्यात विजेच्या खांबाचा शॉक लागून एकाचा मृत्यू तर दुसरीकडे ठाण्यातही घोडबंदर रोडवर एका अज्ञात व्यक्तीचा विजेच्या खांबाचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ठाण्यातील घोडबंदरवरील ओवळा हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली आहे. या ठिकाणी रस्त्यावरील विद्युत खांबामध्ये अचानक वीज प्रवाह उतरला होता. खांबाला स्पर्श झाल्यामुळे एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. या व्यक्तीचा मृतदेह हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर दुसरीकडे घोडबंदर रोड येथील तुळशी धाम येथे झाडं आणि विद्युत पोल कोसळण्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत  कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी आपत्ती व्यवसाथपन आणि अग्निशमन दलाचे जवान रवाना झाले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Santacruz, Sion

    पुढील बातम्या