Good News: आज एका दिवसात 8018 जणांना डिस्चार्ज, रुग्णांच्या संख्येने ओलांडला लाखाचा टप्पा

Good News: आज एका दिवसात 8018 जणांना डिस्चार्ज, रुग्णांच्या संख्येने ओलांडला लाखाचा टप्पा

आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1 लाखाच्यावर झाली आहे. आत्तापर्यंत 1 लाख 1 हजार 172 एवढी झाली आहे.

  • Share this:

मुंबई 2 जुलै: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच एक चांगली बातमीही आलीय. राज्यात आज तब्बल 8018 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1 लाखाच्यावर झाली आहे. आत्तापर्यंत 1 लाख 1 हजार 172 एवढी झाली आहे. आज सोडण्यात आलेल्या ८०१८ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ७०३३ (आतापर्यंत एकूण ७२ हजार २८५) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ४७७ (आतापर्यंत एकूण १४ हजार ३१५), नाशिक मंडळात ३३२ (आतापर्यंत एकूण ५६०२), औरंगाबाद मंडळ ९३ (आतापर्यंत एकूण ३२१४), कोल्हापूर मंडळ १२ (आतापर्यंत एकूण १५५६), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ७०२), अकोला मंडळ ३१ (आतापर्यंत एकूण १९६४), नागपूर मंडळ ३३ (आतापर्यंत एकूण १५३४) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

पुण्यात कोरोना बाधितांची संख्या (Corona patients in Pune) दिवसेंदिवस वाढतच आहे. हा उद्रेक आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. Unlock सुरू असल्याने गर्दी वाढली आहे. व्यवहार सुरू होत आहेत. त्यामुळे बाधितांची संख्याही वाढत आहे. पुण्यात टेस्टिंग (Covid-19 Test)वाढवल्याने जुलै महिन्याअखेर कोरोना बाधितांचा आकडा 40 हजारांचा टप्पा ओलांडू शकतो आणि त्यापैकी 18 हजार पेशंट्स हे Activeअसू शकतात, अशी माहिती पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी 'न्यूज18 लोकमत'ला दिली.

घाम आणि दुर्गंधीच नाही तर आता कोरोनालाही शरीरापासून दूर ठेवणार Deodorant

पालिकेकडे तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने मनपाकडे उपलब्ध असलेले व्हेंटिलेटरर्स आता ससून हॉस्पिटलला दिले जाणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. तसंच पुण्यात तुर्तास पुन्हा लॉकडाऊनचा कोणताही विचार नसल्याचा खुलासाही आयुक्तांनी केला. यासोबतच लक्षणं नसलेल्या कोरोना पेशंट्सनी विनाकारण बेड्स अडवून ठेऊ नयेत, असंही आवाहन पालिका आयुक्तांनी केलं आहे.

लॉकडाऊन उठल्यानंतर Unlock 1 मध्येच राज्यात मोठ्या वेगाने Coronavirus चा प्रसार झाला. ठाणे, पुणे या शहरांमध्ये दुपटीपेक्षा अधिक रुग्ण याच काळात वाढले. मुंबईतही सातत्याने कोरोनारुग्ण वाढत आहेत.

VIDEO : कोरोनामुळे झाला मृत्यू, दफनासाठी 500 मीटर खेचत नेला मृतदेह

विशेषतः मुंबईबाहेरच्या उपनगरांमध्ये या काळात कोरोनारुग्णांचं प्रमाण वाढलं. नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे, मीरा भाईंदर, पनवेल आदी उपनगरांमध्ये कोरोनारुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. याबाबत बोलताना रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, "हा समूह संसर्गाचा प्रकार असू शकतो. मुंबईच्या आसपासच्या परिसरात 15 ते 20 टक्के कम्युनिटी स्प्रेड आहे. सरकार त्यावर काम करत आहे. म्हणूनच मुंबई महानगर परिसरातल्या काही भागांत लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत."

First published: July 2, 2020, 8:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading