मुंबई, 02 जुलै : आपल्याला ताजंतवानं वाटावं, घाम येऊ नये, शरीराला घामाची दुर्गंधी येऊ नये यासाठी आपण डिओडोरंट (Deodorant) वापरतो. मात्र आता हाच डिओडोरंट फक्त घाम आणि दुर्गंधीच नाही तर कोरोनाव्हायरसलादेखील (coronavirus) आपल्यापासून दूर ठेवणार आहे. बाजारात लवकरच डिओडोरंट कम सॅनिटायझर (deodorant-cum-sanitizer) येणार आहे.
आयआयटी कानपूरचा (IIT-Kanpur) माजी विद्यार्थी आणि आयआयटी गुवाहाटीच्या (IIT-Guwahati) प्राध्यापकांनी मिळून डिओडोरंट कम सॅनिटायझर तयार केला आहे. जो आपल्याला ताजंतवानं ठेवण्याशिवाय कोरोनालाही दूर ठेवण्यास मदत करणार आहे. या दोघांनीही कानपूरमधील फ्रँग्रॅन्स अँड फ्लेव्हर डेव्हलमेंट सेंटरमध्ये या डिओवर काम केलं.
या डिओडोरंटमध्ये 80 टक्के इथेल अल्कोहोल, 10 टक्के ग्रीन ऑईल आणि 10 टक्के मॉईश्चराइझर न्यूट्रोजेना ऑईल आहे आणि सुगंधासाठी यामध्ये सुगंधी तेलाचा वापर करण्यात आला आहे.
हे वाचा - गाय, म्हैस नव्हे तर गाढविणीच्या दुधापासून तयार केलं जातं जगातील सर्वात महाग चीझ
आयआयटी कानपूरचा माजी विद्यार्थी अंशिक गंगवारने सांगितलं, "हा डिओडरंट कम सॅनिटायझर आहे. हा डिओ शरीर आणि कपडे दोघांवरही वापरता येऊ शकतो. यामध्ये सॅनिटायझर घटक आहेत. जे कोरोनाव्हायरशी लढण्यासासाठी मदत करतील. यामुळे तुम्ही कोरोनाव्हायरसला दूर ठेवूच शकता शिवाय 7 ते 10 तास तुमच्या शरीरालाही ताजंतवानं आणि दुर्गंधीमुक्त ठेवेल"
"या डिओचा त्वचा आणि पर्यावरणावर काहीही दुष्परिणाम होणार आहे. त्वचा आणि पर्यावरणासाठी सुरक्षित असा हा डिओ आहे. त्याच्या सुगंधामुळे टेन्शनही दूर होण्यास मदत होते. आम्हाला या डिओसाठी पेटंट मिळालं आहे. लवकरच हा बाजारात उपलब्ध करून दिलं जाणार आहे", असंही अंशिकने सांगितलं.
हे वाचा - आता हत्तीही जिममध्ये गाळणार घाम; एक्सरसाइज करून फिट राहणार
कोरोनाव्हायरसवर सध्या कोणतं औषध नाही किंवा लस उपलब्ध नाही. सध्या वेगवेगळ्या आजारांवरील औषधांचं कोरोनावर उपचारासाठी ट्रायल सुरू आहे. तर लसींच्यादेखील चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे कोरोनाव्हायरसपासून आपला बचाव करणं हे आपल्याच हातात आहे. कोरोनाव्हायरसला दूर ठेवण्यासाठी मास्क वापरा. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. हात साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा. घराबाहेर असताना सॅनिटायझर वापरा. बाहेरून कोणतीही वस्तू घरात आणल्यानंतर ती नीट सॅनिटाइझ करून घ्या. फळं-भाज्या गरम पाण्यात स्वच्छ धुवून घ्या आणि घरातही स्वच्छता राखा. अशी छोटी छोटी काळजी आणि खबरदारी घेऊन आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो.
संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lifestyle