• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • निर्दयी! कोरोनामुळे मृत्यू, दफनासाठी 500 मीटर खेचत नेला मृतदेह; VIDEO पाहून स्थानिक संतप्त

निर्दयी! कोरोनामुळे मृत्यू, दफनासाठी 500 मीटर खेचत नेला मृतदेह; VIDEO पाहून स्थानिक संतप्त

कोरोना रुग्णांच्या मृतदेहासोबत वारंवार वाईट वागणूक दिल्याच्या घटना समोर येत आहे

 • Share this:
  बंगळुरु, 2 जुलै : कर्नाटकमधून आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेहासोबत अत्यंत निर्दयीपणे वागणूक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच येथील बेल्लारीमध्येही मृतदेहांकडे दुर्लक्ष केल्याची घटना समोर आली होती. हे प्रकरण यादगीर आणि दावणगरे यांचे आहे. येथे दफन करण्यापूर्वी मृतदेह सुमारे 500 मीटर खेचला नेल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. काय आहे व्हायरल व्हिडीओ हा व्हिडीओ पाहून तुम्हाला संताप येईल. पीपीई किट परिधान केलेले दोन वैद्यकीय कर्मचारी मृतदेह खेचत घेऊन जात आहे. मृतदेहाला दफन करण्यासाठी घेऊन जात आहेत. प्रत्यक्षात गावकऱ्यांनी त्यांच्या गावात मृतदेह पुरण्यास नकार दिला. यानंतर वैद्यकीय कर्मचारी मृतदेह घेऊन गावाच्या बाहेरील भागात गेले. परंतु त्यांनी मृतदेहांसोबत वाईट वागणूक केली. या घटनेनंतर डीएम कुलराम राव यांनी कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. हे वाचा- यापूर्वी असाच एक व्हिडीओ बेल्लारी मधून समोर आला होता. एकामागून एक 8 कोरोना पीडितांचे मृतदेह खड्ड्यात फेकण्यात आले होते. बेल्लारीचे उपायुक्त एस एस नकुला म्हणाले की, त्यांनीही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेतली आहे. “आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत,” असे त्यांनी मंगळवारी सांगितले.     संपादन - मीनल गांगुर्डे
  First published: