मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; सेक्स वर्कर्स महिलांना आर्थिक मदतीचा हात

ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; सेक्स वर्कर्स महिलांना आर्थिक मदतीचा हात

एक वेळच्या अन्नासाठी सेक्स वर्कची धडपड;119 वर्षांचा मुलगा बनला देवदूत;800 कुटूंबाना रेशन किटच वाटप

एक वेळच्या अन्नासाठी सेक्स वर्कची धडपड;119 वर्षांचा मुलगा बनला देवदूत;800 कुटूंबाना रेशन किटच वाटप

सरकारी आकड्यांनुसार पुण्यात 7011, नागपूर 6616, मुंबईत 2687 आणि मुंबई उपनगरात 2305 सेक्स वर्कर्स आहेत, त्यांना ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे मोठी मदत मिळणार आहे

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 27 नोव्हेंबर : राज्य सरकारने देहविक्रय महिलांसाठी पुढाकार घेतला आहे. ठाकरे सरकारने वेश्या व्यवसायातील महिलांसाठी दरमहिन्याला  5 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. (Sex workers will be given financial help ) याशिवाय ज्या महिलांची मुलं शाळेत शिकत आहेत, अशांना अधिक अडीच हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकार यासाठी तब्बल 51 कोटी रुपये खर्च करणार आहे. जी 32 जिल्ह्यातील 30 हजार महिला सेक्स वर्कर्सना ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यासाठी दिले जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी

महाराष्ट्र सरकारने गुरुवारी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 30 हजार सेक्स वर्कर्सना कोविड 19 च्या संकटा दरम्यान मदत दिली जात होती. 32 जिल्ह्यांशिवाय इतर जिल्ह्यांमधील सेक्स वर्कर्सची माहिती मिळवली जात आहे. (Sex workers will be given financial help )

हे ही वाचा-धक्कादायक! रुग्णालयात कुत्रा कुरतडत राहिला मुलीचा मृतदेह; लोक VIDEO करण्यात दंग

ओळखपत्रासाठी दबाव आणू नये

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी संबंघिक विभागाला आदेश दिले आहेत. ही मदत देताना कोणत्याही महिलेकडून ओळख पत्र दाखविण्याचा दबाव आणू नये. सरकारी आकड्यांनुसार पुण्यात 7011, नागपूर 6616, मुंबईत 2687 आणि मुंबई उपनगरात 2305 सेक्स वर्कर्स आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश

यशोमती ठाकूर यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हा आदेश दिला आहे की, ते आपल्या आपल्या भागाची यादी करून पाठवावी. याशिवाय हे देखील सांगावं की कशाप्रकारे अतिरिक्त मदत खाद्य पदार्थांच्या रुपात या सेक्स वर्कर्सना पोहोचविण्यात येऊ शकते. सरकारच्या आदेशानंतर जिल्हा स्तरावर तयार केल्या जाणाऱ्या समितीत महिला अधिकाऱ्यांशिवाय नाको (NACO) च्या स्थानिक प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांचे लोकही सामील होतील. या समितीत महिला आणि बाल कल्याण विभागातील अधिकारी सचिव म्हणून काम करतील.

First published:

Tags: Pune, Udhav thackarey