पवनची प्रकृतीही अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. घरातील सर्व लोक मुलाच्या देखरेखीसाठी गुंतले होते. त्याच वेळी, रिंकीचा मृतदेह रुग्णालयाच्या आवारात एका स्ट्रेचरवर ठेवण्यात आला. मुलीच्या मृतदेहाजवळ त्यावेळी कोणी नव्हते. त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये फिरत असलेल्या भटक्या कुत्र्यांनी मुलीचं शरीर कुरतडायला सुरुवात केली. तिथे उपस्थित लोकांनी याचा व्हिडीओ केला. तर काही लोकांनी मुलीच्या मृतदेहापासून कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती मिळताच मुलीचे कुटुंबीय घटनास्थळी आले.