जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / सोशल मीडियात Viral होणारा हा मेसेज Fake; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

सोशल मीडियात Viral होणारा हा मेसेज Fake; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

सोशल मीडियात Viral होणारा हा मेसेज Fake; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

BMC request citizens to not believe in rumours: मुंबई मनपाच्या नावाने सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल होत आहे. यावर मुंबई मनपाने स्पष्टीकरण दिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 एप्रिल: राज्यात कोरोना विषाणूची साखळी (Coronavirus chain) तोडण्यासाठी सरकारकडून कठोर निर्बंध (strict restrictions) लागू करण्यात आले आहेत आणि मार्गदर्शक सूचनाही (guidelines) जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, याच दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) नावाने सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल (Viral message) होत आहे ज्यामध्ये दुकाने सुरू ठेवण्याच्या संदर्भात ठराविक वेळ दिली आहे. व्हायरल होणाऱ्या या मेसेजनंतर आता मुंबई मनपाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्हायरल होणाऱ्या मेसेजचा फोटो पोस्ट करुन ती माहिती खोटी असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. आपल्या ट्विटमध्ये मुंबई मनपाने म्हटलं, “समाज माध्यमांवर प्रासरित होत असलेली ही माहिती खोटी असून बृहन्मुंबई महानगरपालिकेने असे कुठलेही नियम जाहीर केलेले नाहीत. राज्य शासनाने यापूर्वी जाहीर केलेली मार्गदर्शक तत्वेच लागू आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पसरवूही नका.”

जाहिरात

वाचा : अशी परिस्थिती देशात फक्त एकट्या मुंबईत; BMC ने जारी केली कोरोनाची आकडेवारी कोविड-19 चा प्रसार थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध आणि मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. 1 मे 2021 पर्यंत लागू असलेले हे नियम आता 15 मे 2021 पर्यंत लागू असणार आहेत. यानुसार केवळ अत्यावश्यक सेवा आणि सुविधांच्या व्यतिरिक्त इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांची दुकाने, कृषी उत्पादने यांच्यासाठी ठराविक वेळा निश्चित करुन दिल्या आहेत. मात्र, असे असताना सोशल मीडियात फेक मेसेजेस व्हायरल होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा फेस मेसेजेचवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात