जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / अशी परिस्थिती देशात फक्त एकट्या मुंबईत; BMC ने जारी केली कोरोनाची आकडेवारी

अशी परिस्थिती देशात फक्त एकट्या मुंबईत; BMC ने जारी केली कोरोनाची आकडेवारी

अशी परिस्थिती देशात फक्त एकट्या मुंबईत; BMC ने जारी केली कोरोनाची आकडेवारी

Mumbai coronavirus : मुंबईत सर्वाधिक कोरोना चाचण्या (Mumbai corona test) होऊनही कोरोना पॉझिटिव्हीटी रेट (Mumbai corona Positivity rate) कमी आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 एप्रिल : कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहून मुंबईकरांच्या  (Mumbai coronavirus)  काळजात धस्सं होऊ लागलं आहे. पण आता मुंबईकरांसाठी दिलासादायक अशी आकडेवारी आहे. मुंबईत कोरोनाची सध्या जी परिस्थिती आहे, तशी परिस्थिती असलेलं मुंबई ही देशातील एकमेव शहर आहे. कोरोनाची अशी परिस्थिती देशात फक्त एकट्या मुंबईत आहे, असा दावा मुंबई महापालिकेनं (BMC)  केला आहे. बीएमसीने मुंबईतील कोरोनाची आकडेवारी जारी केली आहे. त्यानुसार मुंबईत आता सर्वाधिक कोरोना चाचण्या (Mumbai corona test)  होऊनही कोरोना पॉझिटिव्हीटी रेट (Positivity rate) कमी आहे. शहरातील पॉझिटिव्हीटी रेट हा आता एक आकडी आहे. महापालिकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 29 एप्रिलला एकूण 43525 कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैकी 4328 कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. हा पॉझिटिव्हिटी दर आता 9.94 टक्के आहे.

null

महिन्याच्या सुरुवातीला 4 एप्रिलला हा दर  27.94 टक्के होता. त्यावेळी 51,313 चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी 11,573 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. म्हणजे हिनाभरात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जवळपास 20 टक्क्यांनी घटला आहे, हेच या आकडेवारीतून दिसून येतं. हे वाचा -  जर लस पुरवठ्यात केंद्र दुजाभाव करतं तर राज्यात सर्वाधिक लसीकरण कसे झाले? मुंबईतील 85 टक्के प्रकरणं लक्षणं नसलेली आहेत. आता बेड्स उपलब्ध झालेले आहेच. नव्या कोरोना रुग्णांची प्रकरणं घटलेली आहे.  सर्वाधिक 44 हजार चाचण्या होऊनही मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे. असा एक आकडी पॉझिटिव्हिटी रेट असलेलं मुंबई देशातील एकमेव शहर आहे. असं बीएमसी आयुक्त इक्बाल चहल (BMC Commissioner Iqbal Chahal) यांनी सांगितलं. गेले काही दिवस मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला. याचं कारण म्हणजे कोरोना चाचणी कमी झाली आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे. चाचण्या कमी होत असल्याने कमी प्रमाणात लोक पॉझिटिव्ह आढळून येत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. हे वाचा -  1 मे पासून लसीकरण सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही याबाबत न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती देताना इक्बाल चहल यांनी सांगितलं,  “फक्त चाचण्या वाढवण्याला महत्त्व नाही. महत्त्वाचा आहे तो पॉझिटिव्ही रेट. म्हणजे दर 100 लोकांमागे किती लोक पॉझिटिव्ह आहेत, ते महत्त्वाचं आहे. मुंबईचा पॉझिटिव्ही रेट आधी 31 टक्के होता जो आता कमी झाला आहे. तसंच मुंबईतील मृत्यूदर हा 0.4 टक्के आहे. जगातील हा सर्वात कमी मृत्यूदर आहे”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात