Home /News /money /

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होणार

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होणार

भारतातील खाद्यतेलाची जवळपास 60% मागणी आयातीतूनच पूर्ण होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींमधील बदलाचा लगेचच भारतातील तेलाच्या किमतींवर परिणाम होतो.

मुंबई 07 जुलै : गेले काही महिने खाद्यतेलांच्या (Edible Oil) किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या महिन्याच्या बजेटला कात्री लागलेली आहे; पण आता मात्र सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. केंद्र सरकारनं खाद्यतेल उत्पादक आणि मार्केटिंग कंपन्यांना आयात केल्या जाणाऱ्या स्वयांपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाच्या एमआरपी (MRP) म्हणजेच कमाल किरकोळ किंमत ( Maximum Retail Price ) तातडीने कमी करण्यास सांगितलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर याबाबत वृत्त देण्यात आलं आहे. पामतेल (Palm Oil), सूर्यफुलाच्या (Sunflower) आणि सोयाबीन (Soyabean) तेलाच्या किमती 10-12 रुपये प्रतिकिलोने कमी करण्यास केंद्र सरकारने या कंपन्यांना सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) आता खाद्यतेलाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली आहे, हे लक्षात घेता येत्या आठवड्याभरातच या तेलांच्या किमती तातडीने कमी झाल्या पाहिजेत,असे आदेश सरकारने दिले आहे. अमेरिकन फॅशन ब्रँड GAP ची उत्पादने भारतात सहज मिळणार! Reliance Retail बनले अधिकृत रिटेलर भारतातील खाद्यतेलाची जवळपास 60% मागणी आयातीतूनच पूर्ण होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींमधील बदलाचा लगेचच भारतातील तेलाच्या किमतींवर परिणाम होतो. सर्व महत्त्वाच्या तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पुढच्या एका आठवड्यात तेलांच्या किंमती कमी करण्याचे आणि केंद्राच्या सल्ल्याचे पालन करण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. केंद्रीय अन्न सचिव (Central Food Secretary) सुधांशू पांडे यांनी याबाबत एक महत्त्वाची बैठक घेतली. यामुळे अर्थातच ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या एका महिन्यात शेंगदाणा म्हणजेच भुईमूग (Groundnut ) आणि वनस्पती तेल (Vegetable Oil) वगळता अन्य सर्व तेलांच्या किंमतीत झपाट्याने घट झाली आहे. “गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारने उचललेल्या पावलांमुळेही या किंमती कमी झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमती कमी झाल्यानंतर पूर्वीच्याच किंमतींना तेल विकलं जाऊ शकत नाही, ” असं या बैठकीत सहभागी झालेल्या एका सूत्राने सांगितलं. गेल्या एका आठवड्यात जागतिक स्तरावर तेलाच्या किमती कशा रितीने (edible Oil Price Reduces In Global Market) कमी झाल्या आहेत याचे प्रात्यक्षिक सरकारच्या वतीने या बैठकीत दाखवण्यात आले. एकाच ब्रँडच्या तेलाची संपूर्ण देशभरात समान किंमत ठेवता येऊ शकते का याबाबतही सरकारने विचारणा केली आहे. सध्या विविध प्रदेशांमध्ये एकाच ब्रँडच्या तेलाच्या किमतीतही 3-5 रुपये प्रतिलिटर फरक आढळतो. त्याऐवजी एकच किंमत ठेवण्यास (One price for Same Brand) सरकारने सांगितलं आहे. वीज बिल निम्म्यावर आणू शकतात हे उपाय; AC वापरताना या गोष्टींवर ठेवा नजर त्याचप्रमाणे तेलाचं पॅकिंग, त्यांच्या व्यापार पद्धतीचा मुद्दाही या बैठकीत मंत्रालयाच्या वतीने उपस्थित करण्यात आला. ग्राहकांनी तेलाच्या किमतींबरोबरच, अयोग्य पॅकिंग पद्धतीबद्दलही (Wrong Packaging) तक्रारी केल्याचं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं. काही कंपन्यांच्या तेलांचं पॅकिंग 15 डिग्री सेल्सिअसवर होते, असा दावा सुधांशू पांडे यांनी या बैठकीत केल्याचं पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. मात्र हे पॅकिंग 30 अंश सेल्सिअसवरच होणं आवश्यक असल्याचंही पांडे म्हणाले आहेत. तेल 15 अंश सेल्सिअसवर पॅक केल्यास ते आणखी पातळ होतं आणि त्याचं वजन कमी होतं. पण तेलाच्या पाकिटावर कमी झालेलं वजन छापण्यात येत नाही. ही अत्यंत चुकीची व्यापार पद्धत असल्याचं पांडे यांनी सांगितलं. “उदाहरणार्थ 15 अंश सेल्सिअसवर पॅक करण्यात आलेल्या खाद्यतेलाचं वजन 910 ग्रॅम आहे असं छापण्यात येतं. पण प्रत्यक्षात मात्र हे वजन 900 ग्रॅमपेक्षाही कमी असतं, ” असं उदाहरणही पांडे यांनी दिलं आता आपल्या संपूर्ण देशातच विविवध सणवार सुरु होत आहेत. सणांच्या तोंडावर तेलांच्या किमती कमी होणं ही सर्वसामान्यांना खरोखरंच मोठा दिलासा देणारी गोष्ट आहे.
First published:

Tags: Money

पुढील बातम्या