नागपूर, 12 जून : नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Shiv Sena candidate Sanjay Pawar) यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर भाजपने आकड्यांचं गणित जुळवत आपले तिसरे उमेदवार धनंजय महाडिक (BJP candidate Dhananjay Mahadik) यांना विजयी केलं. शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव हा शिवसेनेसाठी एक मोठा धक्कादायक निकाल ठरला. अपक्षांनी भाजपला मतदान केल्याने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. या निकालानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर गंभीर आरोप केला आणि भाजपला मतदान करणाऱ्या अपक्षांची थेट नावेच जाहीर केली. मात्र, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपांमुळे अपक्ष आमदार नाराज झाले आहेत.
संजय राऊत यांनी ज्या अपक्ष आमदारांची नावे घेतली त्यामध्ये अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांचंही नाव आहे. देवेंद्र भुयार यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला सुद्धा निघाले आहेत. शरद पवारांची भेट घेण्यासाठी निघण्यापूर्वी देवेंद्र भुयार यांनी एक मोठं विधान केलं आहे.
वाचा : निवडणुकीत कुठल्या आमदारांची मते मिळाली नाही? संजय राऊतांनी थेट आमदारांची नावेच केली जाहीरमतदान करुनही असे बोलत असतील तर...
अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं, मी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत निवडून आलो आहे. लोकसभा निवडणुकीपासून मी आघाडीसोबत आहे. संजय राऊत यांचा पक्ष आत्ता आघाडीसोबत आला. मी कायम शरद पवार, अजित पवार यांच्यासोबत आहे. गद्दारी करायची असती तर यापूर्वीच केली असती पण मतदान करुनही असे बोलत असतील तर संजय राऊत यांचं कुटंतरी चुकत आहे. आमच्याबद्दल अशा प्रकारचं अविश्वास दाखवणं चुकीचं आहे.
मतदान कुणाला केलं...
देवेंद्र भुयार यांनी म्हटलं, मी जाहीरपणे येऊन सांगितलं आहे की, पहिल्या पसंतीचं मतदान संजय पवार, दुसऱ्या पसंतीचं मतदान संजय राऊत यांना केलं आहे. एका मंत्रिमहोदयांनी मला टोकलं सुद्धा की मतदान कुणाला सांगायचं नसतं. पण मी सांगितलं की मी कुणाला बांधिल नाही. मला भाजप चालत नाही आणि मी त्यांना मतदान करणार नाही. अनिल बोंडे हे माझ्या विरुद्ध निवडणूक लढल्याने त्यांच्याविरोधात मतदान करण्याचं कारणच नाही.
वाचा : अपक्ष आमदारांनी खरंच भाजपला मतदान केलं? संजय राऊतांच्या आरोपांवर देवेंद्र भुयार यांनी म्हटलं...शिवसेनेकडून एकही फोन आला नाही तरी...
देवेंद्र भुयार यांनी म्हटलं, शिवसेनेचं नियोजन चुकलेलं आहे. मला एक सुद्धा फोन शिवसेनेकडून आला नाही तरी मी त्यांना मतदान केलं आहे. आम्ही शरद पवारांची भेट घेणार आहोत. प्रामाणिकपणे मतदान करुन सुद्धा अशा प्रकारे आमच्याबाबत विधान केले जात असतील तर हे चुकीचं आहे. आम्हालाही लोकांनी निवडून दिलं आहे आणि अशावेळी आमच्याविषयी गैरसमज करणं चुकीचं आहे.
अपक्ष आमदार घेणार मोठा निर्णय?
आता आम्हाला सर्व अपक्ष आमदारांना एकत्र येऊन विचार करावा लागेल. हा केवळ माझ्या एकट्यावर नाही तर सर्व अपक्षांवर दाखवलेला अविश्वास आहे असंही आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.
वाचा : "मविआला पाठिंबा आणि अजितदादा सांगतील तिथं मतदान" म्हणणाऱ्या आमदारांचं भाजपला मतदान? वाचा काय आहे प्रकरण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमचा संपर्कच होत नाही. मी पूर्वी सुद्धा बोललो आहे. साहेबांना जवळपास मी 16-17 पत्रे लिहिली आणि त्याची उत्तरे सुद्धा मला मिळाली नाही. आमचे प्रश्न मार्गी लागत नसतील तर मी सांगायेच कुणाला? असा प्रश्नही आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.
आपली नाराजी ते शरद पवारांसमोर व्यक्त करणार आहेत. अपक्ष आमदार हे नाराज झाले आहेत आणि येत्या आठ दिवसांत विधानपरिषदेसाठी निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने होते त्यामुळे अपक्ष आमदारांची नाराजी शिवसेनेला भोवणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.