मुंबई, 21 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारला आहे. त्यांच्यासोबत 29 आमदार सुरतच्या ली-मॅरेडियन हॉटेलमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मुंबईतून मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक सुरतला पोहोचले आहे. ते एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यात यशस्वी होतील का? याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. गेल्या 20 मिनिटांपासून नार्वेकर आणि शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तब्बल एक तासाहून अधिक वेळ त्यांची बैठक सुरू होती. अखेर त्यांची बैठक संपली असून नेमकं काय घडणार याबाबत उत्सुकता आहे. सुरतेच्या खलबतांनंतर काय होऊ शकतं? -पक्षांतर्गत होणाऱ्या घटनांमुळे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. जर नार्वेकर त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरले नाही तर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे. पण एकनाथ शिंदे कोणत्याही पक्षात जाणार नाही. नाराज आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. याचा अर्थ आपल्या 29 आमदारांसोबत ते भाजपसोबत सत्ता स्थापन करू शकतात. - पुढील काही तासात एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह अमित शाह यांची भेट घेतील. सत्ता स्थापनेसंदर्भात किंवा दुसरा काय पर्यात असू शकतो याबाबत भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा केली जाईल. -अन्यथा एकनाथ शिंदे स्वतंत्र गट स्थापन करू शकतात. मात्र यामुळे संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. - एकनाथ शिंदे हे बंडाच्या भूमिकेवर ठाम राहिले असतील तर शिवसेना त्यांना पक्षाच्या पदातूनही हटवू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.