मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Raj Thackeray : 'मी गद्दारी करून बाहेर पडलो नाही', राज ठाकरे गरजले

Raj Thackeray : 'मी गद्दारी करून बाहेर पडलो नाही', राज ठाकरे गरजले

त्यामुळे मी दगा फटका करून, खंजीर खुपसून बाहेर गेलो नाही. बाहेर जाऊन कुठल्या पक्षात गेलो नाही, तुमच्या बळावर पक्ष उभा केला'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 ऑगस्ट :  'मी  शिवसेनेतून दगा फटका करून, खंजीर खुपसून बाहेर गेलो नाही. बाहेर जाऊन कुठल्या पक्षात गेलो नाही, तुमच्या बळावर पक्ष उभा केला. बाळासाहेबांना भेटून पक्ष उभा केला' असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी शिवसेना सोडण्याचे कारण सांगितलं.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबई पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी जोरदार भाषण केलं. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना, शिंदे गट आणि राजकीय घडामोडींवर परखड भाष्य केलं.

'कोण कुणामध्ये मिसळलं हे कळत सुद्धा नसेल. हे जर राजकारण असं तुम्हाला वाटत असेल तर हे तात्पुरती आर्थिक अडजेमेंस्ट आहे. मी मुलाखतीत सुद्धा सांगितलं होतं. भुजबळ, नारायण राणे यांचं बंड झालं. त्यांनी बंड केलं आणि एका पक्षात गेले. पण या राज ठाकरेने बाळासाहेब ठाकरे यांना भेटून सांगितलं आणि बाहेर पडला. बाळासाहेबांना जेव्हा कळलं होतं, आत हा काही राहत नाही. ही शेवटची भेट आहे. मातोश्रीतून निघताना मनोहर जोशी तिथे होते, जोशी बाहेर गेल्यानंतर मला बाळासाहेबांनी खोलीत भेटायला बोलावलं आणि हात पसरवून मिठी मारली आणि जा म्हणून सांगितलं. त्यांना समजलं होतं. त्यामुळे मी दगा फटका करून, खंजीर खुपसून बाहेर गेलो नाही. बाहेर जाऊन कुठल्या पक्षातही गेलो नाही, तुमच्या बळावर पक्ष उभा केला''  असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

जे आता सगळं चालू आहे ना, ही चांगली गोष्ट नाही. आधी महाराष्ट्रामध्ये असं काहीही नव्हतं. 2019 ला मतदारांनी मतदान केलं ना, त्याला कळत सुद्धा नसेल कुणाला मतदान केलं. कोण कुणामध्ये मिसळलं हे कळत सुद्धा नसेल. हे जर राजकारण असं तुम्हाला वाटत असेल तर हे तात्पुरती आर्थिक अडजेमेंस्ट आहे. मी मुलाखतीत सुद्धा सांगितलं होतं. भुजबळ, नारायण राणे यांचं बंड झालं. त्यांनी बंड केलं आणि एका पक्षात गेले, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

('युतीचं भान ठेवा', बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी)

'शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली. त्यानंतर दोघांनी फारकत घेतली. काय तर म्हणे, अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली होती. मला आजही आठवतं मी त्यावेळी बैठकीला हजर राहत होतो. कधी घरी बैठका व्हायच्या किंवा सेंटार हॉटेलमध्ये बैठक व्हायची. त्यावेळी मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे असे अनेक नेते हजर होते. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे ठरलं होतं. जर हे ठरलं होतं तर मग 2019 ला मागणी कशीच करू शकता. शिवसेने आमदार कमी आले होते. चार भिंतीमध्ये कमिटमेंट घेतली होती. त्या चार भिंतीमध्ये होत तरी कोण, एकतर हे खोटं बोलताय नाहीतर ते खोट बोलताय.  मुळात तुम्ही मागितलं कसं, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री मग तुम्ही मागताच कसे? असा सवालच राज ठाकरेंनी केला.

पंतप्रधान मोदी जेव्हा भाषण करत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे सुद्धा बसलेले होते. भाषणात मोदींनी सांगितलं सत्ता आल्यावर फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. अमित शहांनी सुद्धा तेच सांगितलं. मग त्यावेळी आक्षेप का घेतला नाही. त्याच वेळी फोन का केला नाही. त्याचवेळी भेटला का नाही, तुम्ही मला वेगळं सांगितलं आणि आता वेगळ बोलत आहात. निकाल लागल्यावर सगळंच कसं आठवलं. मग काय काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. मग लोकांनी मतदान कुणाला केलं. असं समजूया शिवसेना आणि भाजपला मतदान करणारे लोकं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करणारी लोकं.  लोकांना असं वाटत असेल आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार नको म्हणून तुम्हाला मतदान केलं आणि तुम्हीच त्यांच्यासोबत कसं गेला? हिंमत कशी होते. मतदानांची किंमत कशी केली नाही. जोपर्यंत लोक या सरकारला विचारत नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही, अशी टीकाही राज ठाकरेंनी केला.

(मुख्यमंत्री शिंदे अधिवेशनात शेतकऱ्यांवर बोलत होते, मंत्रालयाबाहेरच शेतकऱ्याने घेतले पेटवून!)

महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले त्या महाराष्ट्राचे आज प्रबोधन करायची वेळ आली आहे. पक्षातील पदाधिकारी एकमेकांच्या विरोधात जर सोशल मीडियावर काही लिहीत असतील तर एक क्षण सुद्धा पक्षात स्थान नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दम दिला.

शिवाजी महाराज फक्त आता राजकरणासाठी वापरत आहे . महापुरूष राजकरणासाठी आणि जातीत विभागले आहेत. सगळ्यांची वाईट नजर महाराष्ट्रावर आहे. पेशव्यांनी स्वत:ला कधी छत्रपती म्हणून घेतले नाही ते विचार पुढे घेऊन जात आहे. मी बाळासाहेब आणि प्रबोधनकारांचे विचार पुढे घेऊन जात आहे माझ्याकडे विचार आहे चिन्ह , नाव असलं काय नसलं काय, विचाराने मी श्रीमंत आहे, असंही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं

निवडणुकांना अंत्यत हिंमतीने आणि ताकीतीने लढायची आहे  ॲडजेस्टमेंट करून निवडणुका लवढवू नका शुन्य किंमत होईल. सभा मेळावे मी सुरू करणार आहे. गणपती झाले की दौऱ्यावर निघणार आहे, असंही राज ठाकरेंनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Lokmat news, Lokmat news 18, Maharashtra News, Marathi news