मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'युतीचं भान ठेवा', बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी

'युतीचं भान ठेवा', बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी

Eknath Shide Chandrashekhar Bawankule

Eknath Shide Chandrashekhar Bawankule

शिंदे-भाजप (CM Eknath Shinde) युतीला दोन महिने होत नाहीत तोच दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. या वादाचं कारण ठरलंय भाजपचे (BJP) नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलेलं वक्तव्य.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 ऑगस्ट : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे (CM Eknath Shinde Shivsena) 40 आणि अपक्ष 10 अशा एकूण 50 आमदारांसोबत बंड केलं, यानंतर भाजपसोबत (BJP) युती करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे-भाजप युतीला दोन महिने होत नाहीत तोच दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. या वादाचं कारण ठरलंय भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलेलं वक्तव्य.

अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या मतदारसंघात रविवारी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. दहीहंडीच्या या कार्यक्रमात बोलताना बावनकुळे यांनी अमरावतीचा पुढचा खासदार आणि बडनेऱ्याचा आमदार भाजपचा असेल, असं वक्तव्य केलं होतं. बावनकुळेंचं हे वक्तव्य म्हणजे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत असल्याचंही बोललं गेलं.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे अमरावतीचे माजी खासदार आणि शिंदे गटात गेलेले शिवसेना नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) चांगलेच नाराज झाले आहेत. राज्यात युती टिकवायची असेल तर भाजपने संयम ठेवून बोलावे. अमरावती बुलढाणा हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे, त्यामुळे आमदार आणि खासदार भाजपचा म्हणणं चुकीचं आहे. आम्ही सोबत आहोत याचं भान चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठेवावं, असं आनंदराव अडसूळ म्हणाले, तसंच बावनकुळे यांच्या वक्तव्याची आपण फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही आनंदराव अडसूळ यांनी सांगितलं.

अडसूळ नाराज का?

अमरावतीचा पुढचा खासदार आणि बडनेऱ्याचा आमदार भाजपचाच असेल, अशी घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्यामुळे आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांची अडचण होऊ शकते. 2019 लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनीच शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.

खासदार नवनीत राणा या 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अमरावतीमधून निवडून आल्या, तर त्यांचे पती रवी राणा हेदेखील बडनेरा मतदारसंघातून विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले. निवडणुकीनंतर मात्र त्यांनी भाजपसाठी अनुकूल अशी भूमिका घेतली.

महाराष्ट्रामध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा आनंदराव अडसुळांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी अडसुळांची नेतेपदी निवड केली.

First published:
top videos

    Tags: BJP, Eknath Shinde, Shivsena