जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुख्यमंत्र्यांकडून माझ्यावर पाळत ठेवली जातेय, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

मुख्यमंत्र्यांकडून माझ्यावर पाळत ठेवली जातेय, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

'आता एकदा सरकारने निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी त्याविषयावर बोलणार नाही. सरकार आणि संघटन वेगवेगळे असतात'

'आता एकदा सरकारने निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी त्याविषयावर बोलणार नाही. सरकार आणि संघटन वेगवेगळे असतात'

‘महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे’

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 जुलै: महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचा सामना अजूनही सुरूच आहे. स्वबळाच्या नारेबाजीनंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावरच गंभीर आरोप केले आहे. ‘त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे, त्यामुळे मी कुठे काय करतो याची सगळी माहिती त्यांना माहिती आहे’ असा खळबळजनक आरोप पटोले यांनी केला आहे. मुंबई काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली जात आहे. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलत असताना नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. पुणे: KISS करताना रोखल्यानं भडकल्या तरुणी; केअर टेकरला मारहाण करत तोडला दात ‘त्यांच्याकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाचा कार्यभार आहे. त्यामुळे यंत्रणांना सर्व रिपोर्ट त्यांना द्यावे लागतात. राज्यात कुठे काय चालू आहे, आंदोलनं कुठे होत आहे. याबद्दलची प्रत्येक अपडेट त्यांना द्यावी लागत असतात. मी कुठे काय करतो, हे सुद्धा त्यांना माहीत असते’, असा दावाच पटोले यांनी केला आहे. तसंच, ‘राज्यात काँग्रेस वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पक्ष आणखी बळकट करण्याचा आम्हाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. याबद्दल त्यांना माहिती असून ते कुठे ना कुठे आपल्याला पिंजऱ्यात आणायचा प्रयत्त करणार’ असंही पटोले म्हणाले. पाय घसरून पडल्यानं गर्भवतीनं गमावलं बाळ; मिळाली 9 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा तर, नाना पटोले हे काँग्रेसचे नेते आहे. ते राज्यभरात दौरे करत असतात. त्यांच्या सुरक्षेत पोलीस अधिकारी हजर असतात. त्यामुळे त्यांना संशय आला असेल म्हणून वक्तव्य केले त्यात गैर नाही. विनाकरण कोणास संशय व्यक्त केला नसेल. अशी कोणतीही तक्रार नाही, अशी प्रतिक्रिया माणिकराव ठाकरे यांनी दिली. तर, नाना पटोले हे पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतात, फिरतात. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना वाटते ती भूमिका मांडणे गैर नाही. त्यांचे फोन टॅप होतात पाळत ठेवतात का यावर एच के पाटील अधिक बोलतील. , असं भाई जगताप यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress
  • First Published :
जाहिरात
जाहिरात