जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / भिवंडी: जादूटोण्याच्या संशयातून पतीचं पत्नीसोबत विचित्र कृत्य; भयावह अवस्थेत आढळली महिला

भिवंडी: जादूटोण्याच्या संशयातून पतीचं पत्नीसोबत विचित्र कृत्य; भयावह अवस्थेत आढळली महिला

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Crime in Bhiwandi: पत्नीवर कोणीतरी जादूटोणा केला असावा, त्यामुळेच ती आपल्याला त्रास देत आहे, या संशयातून एका तरुणाने पत्नीसोबत विचित्र कृत्य केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भिवंडी, 23 डिसेंबर: पत्नीवर कोणीतरी जादूटोणा (suspicion of black magic) केला असावा, त्यामुळेच ती आपल्याला त्रास देत आहे. या संशयातून एका तरुणाने आपल्या पत्नीसोबत विचित्र कृत्य केलं आहे. आरोपीनं घरातील धारदार चाकून पत्नीवर सपासप वार (Attack with knife) केले आहेत. पत्नी घरात गंभीर जखमी (Wife injured) अवस्थेत पडल्यानंतर आरोपी पतीने घटनास्थळावरून पळ काढला आहे.. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला असून आरोपी पतीचा शोध घेतला जात आहे. संबंधित घटना मंगळवारी रात्री घडली आहे. कुरेशा इरफान शेख असं हल्ला झालेल्या महिलेचं नाव आहे. तर इरफान रफिक शेख असं हल्ला करून फरार झालेल्या आरोपी पतीचं नाव आहे. फिर्यादी आणि आरोपी दोघंही भिवंडी परिसरातील करवली गावातील एका चाळीत राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इरफान शेख याला दारूचं व्यसन आहे. दारू पिऊन घरी आल्यानंतर तो किरकोळ कारणातून नेहमी आपल्या पत्नीसोबत वाद उकरून काढत असतो. हेही वाचा- मित्रांनीच दिली नराधमला साथ, जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार घटनेच्या दिवशी देखील आरोपीनं दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ केली होती. तसेच ‘तुझ्यावर कोणीतरी जादूटोणा केला आहे, त्यामुळे तू मला त्रास देत आाहेस’ असा आरोपही पतीने यावेळी केला होता. यामुळे पती पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. हाच राग मनात धरून आरोपी पतीने पत्नीला ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण होतं असताना, पीडित महिलेनं आरोपीचा हात पकडला. हात पकडल्याच्या कारणातून संताप अनावर झाल्याने आरोपीनं स्वयंपाक घरातील चाकू घेऊन येत पत्नीवर सपासप वार केले आहे. हेही वाचा- प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनं चिमुकल्याचा घोटला गळा; अनैतिक संबंधातून काढला काटा आरोपीनं पत्नीच्या गळ्यावर आणि डाव्या हातावर चाकुने वार करत हत्येचा प्रयत्न केला आहे. यानंतर पत्नीला जखमी अवस्थेत सोडून आरोपीनं घटनास्थळावरून पोबारा केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेचा पुढील तपास भोईवाडा पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात