मुंबई, 05 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्पा लागू झाला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेुनसार देशभरात दारूची दुकानं सुरू करण्यात आली आहे. राज्यात काही भागात दुकानं उघडण्यात आली आहे. या एकाच दिवसात महसुलाचा आकडा समोर आहे. राज्यात 4 मे रोजी लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यात आली. ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोननुसार आणि नियमांचे पालन करत दारूची दुकानं उघडण्यात आली होती. तब्बल दीड महिन्यानंतर दारूची दुकानं उघडल्यामुळे तळीरामांची एकच झुंबड उडाली होती. ठिकठिकाणी वाईन शॉप्सवर तळीरामांच्या रांगाच्या रांगा पाहण्यास मिळाल्या होत्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एका दिवसात 10 ते 11 कोटींचा महसूल जमा झाला आहे. एका दिवसात राज्यभरात ठिकठिकाणी आलेल्या आकडेवारी नुसार, 3 ते 4 लाख लिटर दारूची विक्री झाली आहे. यातून ही 10 ते11 कोटी महसूल मिळाला असून यात आणखी वाढ होणार आहे. हेही वाचा - काय म्हणायचं याला! वाईन शॉपमध्ये घुसला आणि 95 हजारांची दारू घेऊनच पडला बाहेर काही जिल्ह्यात जिल्हाधिकारी उपस्थितीत नसल्यामुळे त्या भागात दारू विक्रीची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक वाईन शॉप्स हे बंद होते. पण जी दुकानं उघडण्यात आली होती. त्यातून हा महसूल जमा झाला आहे, अशी माहिती कांतिलाल उमाप यांनी दिली. महिन्याला किती महसूल जमा होतो? दरम्यान, लॉकडाउन 3 ची अंमलबजावणी करत असताना देशभरात दारू विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. दारू विक्री बंद असल्यामुळे महिला आणि दारूविरोधी संघटनांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केलं होतं. परंतु, तळीरामांची पुरती गैरसोय झाली होती. अखेर आता दारू विक्रीस परवानगी मिळाल्यामुळे सर्वच स्तरातून या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. **हेही वाचा -** PHOTOS :…आता चीनला जावू नका, तळीरामांच्या वाईन्स शॉपवर उड्या पण, असं असलं तरीही दारू विक्रीचा निर्णय हा राज्यासाठी फायदेशीरच असतो. राज्य उत्पादन शुल्क विभाग हे तिसऱ्या क्रमांकाचे महसूल निर्मिती विभाग आहे. या विभागाकडून दरवर्षी तब्बल २७ हजार कोटी वार्षिक उत्पन्न मिळते. राज्याला सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या विभागांमध्ये पहिल्या नंबरवर जीएसटी विभागाचा आहे. जीएसटी विभाग 1 लाख कोटी आणि व्हॅटच्या माध्यमातून 30 हजार कोटी उत्पन्न राज्याला मिळते . तर दुसऱ्या नंबरवर स्टॅम ड्युटी विभागातून 27 हजार 500 कोटी राज्याला उत्पन्न मिळते. मुंबई आणि ठाण्यात किती दुकानं मुंबई शहर - 350 दुकाने मुंबई उपनगर - 769 दुकाने ठाणे - 992 पालघर - 621 रायगड - 608 विभागानुसार दुकानं कोकण विभाग - 3 हजार 341 पुणे विभाग - 1 हजार 906 नाशिक विभाग - 1 हजार 081 कोल्हापूर विभाग - 1316 औरंगाबाद विभाग - 1 हजार 664 नागपूर विभाग - 1 हजार 895 राज्यात एकूण दुकानं - देशा दारुची दुकानं : 4 हजार 159 - वाईन शाॅप दुकानं : 1 हजार 794 - बीअर शाॅपी : 4 हजार 947 - वाईन विक्रीची दुकाने : 31 असे राज्यात एकूण 11 हजार 203 मद्य विक्रीची दुकाने आहेत. या दुकानाच्या माध्यमातून होणाऱ्या विक्रीत राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल निर्माण होतो. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.