जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / कोर्टाची सूचना 'पुरावे तपासून आरोप करा', मलिक म्हणाले, 'लढा सुरूच राहणार'

कोर्टाची सूचना 'पुरावे तपासून आरोप करा', मलिक म्हणाले, 'लढा सुरूच राहणार'


'सत्यमेव जयते' म्हणत चुकीच्या बाबी विरोधातला आपला लढा सुरूच राहणार, असं मलिक यांनी आता ठणकावून सांगितलं आहे.

'सत्यमेव जयते' म्हणत चुकीच्या बाबी विरोधातला आपला लढा सुरूच राहणार, असं मलिक यांनी आता ठणकावून सांगितलं आहे.

‘सत्यमेव जयते’ म्हणत चुकीच्या बाबी विरोधातला आपला लढा सुरूच राहणार, असं मलिक यांनी आता ठणकावून सांगितलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 नोव्हेंबर :  मुंबई ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानला अटकेच्या  (aryan khan) कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक  (nawab malik) यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यांच्याविरोधात दाखल केलेली ज्ञानदेव वानखेडे यांची याचिका हायकोर्टाने (Bombay High Court ) फेटाळून लावली आहे. तसंच, मलिक यांनाही पुरावे एकदा तपासून आरोप करावे, अशी सूचना दिली आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी आर्यन खानला केलेली अटक ही बनावट असल्याचं सांगत अनेक पुरावे सादर केले होते. एवढंच नाहीतर समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावाच करत त्यांनी अनेक फोटो आणि कागदपत्र ट्वीट केले होते. त्यामुळे वानखेडे कुटुंबीयांनी बचावासाठी कोर्टात धाव घेतली होती. IISER Recruitment: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन पुणे इथे भरती समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांना मुंबई हायकोर्टात याची दाखल केली होती. पण, आज कोर्टाने त्यांना दिलासा दिला नाही.  नवाब मलिक यांना समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करण्यास मुंबई हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे.  मात्र, नवाब मलिक यांना यापुढे वाजवी पद्धतीने माहितीची खातरजमा करूनच ट्विट करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहे. ज्ञानदेव वानखेडे यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावल्यानंतर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात

‘सत्यमेव जयते’ म्हणत चुकीच्या बाबी विरोधातला आपला लढा सुरूच राहणार, असं मलिक यांनी आता ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे याही पुढे आता नवाब मलिक वानखेडे कुटुंबावर आरोप करू शकता हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात