जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईकरांनो सावधान! पुढील दोन दिवस बरसणार मुसळधार पाऊस

मुंबईकरांनो सावधान! पुढील दोन दिवस बरसणार मुसळधार पाऊस

मुंबईकरांनो सावधान! पुढील दोन दिवस बरसणार मुसळधार पाऊस

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसानं अक्षरशः धुमशान घातला आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 सप्टेंबर : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसानं अक्षरशः धुमशान घातला आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. बंगलाच्या उपसागरात आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम किनारपटटी, मुंबई तसंच महाराष्ट्राच्या काही भागात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पुढील दोन ते तीन दिवस मान्सून राज्यभरात सक्रिय राहील. गुरुवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सोमवारी (2 सप्टेंबर) रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं सखल भागांत पाणी साचलं होतं. हिंदमाता, सायन, अॅन्टॉप हिल, वांद्रे, टिळकनगर, मिलन सबवे येथील सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं होतं. (वाचा : मंदीमुळे लोक रस्त्यावर येतील,त्यांनाही गोळ्या घालणार काय? उद्धव ठाकरेंचा सवाल) गडचिरोलीत गावांचा संपर्क तुटला गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्याचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. जवळपास 100 गावांचा संपर्क तुटला आहे. मंगळवारी (3 सप्टेंबर)पर्लकोटा नदीसह बांडीया नदीला पूर आल्याने मोठा पूल पाण्याखाली बुडाला आहे तसंच कुमरगुडा नाल्याचा पूल देखील पाण्याखाली गेल्याने या भागातल्या गावांसह तालुक्याचा संपर्क तुटला होता. अजूनही हीच परिस्थिती कायम आहे. (वाचा : काँग्रेसच्या चाणक्यला अटक; डी.के.शिवकुमार ईडीच्या जाळ्यात! ) भिवंडीत जोरदार पाऊस गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलं झालं आहे. तीनबत्ती बाजार पेठेतील 100 हून अधिक दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. (पाहा : SPECIAL REPORT: रिअल हिरो अभिनंदन यांचा नवा जोश, नवा लूक पाहिलात का? ) कोयना धरणात पाण्याची आवक वाढली महाबळेश्वर जिल्ह्यात मुसळाधार पावसामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांवरून तीन फुटांवर  उचलण्यात आले आहेत.  धरणातून  30 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 105 क्षमतेच्या कोयणा धरणात 104.5 टीएमसी पाणीसाठा सध्या आहे. VIDEO: राज्यात पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात