पुणे, 11 जुलै : सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत (Rain in Maharashtra) असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. पावसामुळे निर्सगाचे सौंदर्य खुलले आहे. (Nature in Rain) यामुळे अनेक जण पर्यटनालाही प्राधान्य देत आहेत. मात्र, यातच एक वाईट बातमी समोर आली आहे. पर्यटनाला गेलेल्या एका तरुणाच्या अंगलट आले आहे. नेमकं काय घडलं - राज्यात सर्वत्र जोरदार होत असलेल्या पावसाचा पर्यटक आनंद घेत आहेत. मात्र, लोणावळ्यात (Lonavala Rain) वर्षा विहारासाठी आलेला पर्यटक भुशी धरणात (Bhushi Dam) बुडाला आहे. साहिल सरोज, असे धरणात बुडालेल्या तरुणाचे (Youth Drowned in Bhushi Dam) नाव आहे. साहिल सरोज हा तरुण त्याच्या इतर सहकाऱ्यांसह लोणावळ्यात आला होता. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या धबधब्याखाली साहिल वर्षाविहाचा आनंद घेत होता. मात्र, याचवेळी त्याचा पाय घसरला आणि तो थेट भुशी धरणात बुडाला आहे. घटनास्थळी शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि लोणावळा पोलीस दाखल झाले आहेत. धरणातील पाण्यात साहिलचा शोध सुरू आहे.
लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आलेला पर्यटक भुशी धरणात बुडाला आहे. साहिल सरोज असं धरणात बुडालेल्या तरुणाचं नाव आहे pic.twitter.com/rfPiBxflkD
— News18Lokmat (@News18lokmat) July 11, 2022
मागच्या आठवड्यातही घडली अशीच घटना - तर मागच्या आठवड्यातही मैत्रिणीसोबत पर्यटनासाठी आलेली तरुणी नदी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. ही घटना मावळ-कुंडमळा परिसरातील इंद्रायणी नदीपात्रात घडली. साक्षी सतीश वंजारे, असे वाहून गेलेल्या तरुणीचे नाव होते. हेही वाचा - पुण्याच्या तरुणाला थायलंड ट्रीप पडली महागात, बायकोमुळे पासपोर्टची पानं फाडली अन् विमानतळावरच घडला अनर्थ! पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी परिसरातून ती मैत्रिणी सोबत फिरायला आली होती. नदीपात्राच्या बाजूने फिरत असताना पाय घसरून ही तरुणी पडली आणि इंद्रायणी नदी पात्रात वाहून गेली.