मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र,'...तर तुमच्या 'कोरोना योद्धे' म्हणण्याला अर्थ नाही'

अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र,'...तर तुमच्या 'कोरोना योद्धे' म्हणण्याला अर्थ नाही'

कोरोनाच्या संकट काळात जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरून अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं आहे.

कोरोनाच्या संकट काळात जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरून अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं आहे.

कोरोनाच्या संकट काळात जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरून अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं आहे.

मुंबई, 19 मे : जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला असून भारतातही रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे 35 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 1 हजारांहून जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. कोरोनाच्या संकट काळात आरोग्य कर्मचारी, पोलीस, प्रशासकीय अधिकारी हे जीव धोक्यात घालून काम करत आहेत. यातील काही डॉक्टर आणि पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली तर काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आरोग्य कर्मचारी आणि पोलीस यांच्याही मानधनात सरकारनं कपात केली आहे.

कोरोना योद्धे जीव धोक्यात घालून लढत असताना त्यांच्या वेतनातच कपात केल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने अमित ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. अमित ठाकरे यांनी म्हटलं की, कोरोनाच्या लढाईत सगळ्यात जास्त जीव धोक्यात घालून लढणाऱ्या आरोग्य सेवकांच्याच( बंधपत्रित डॉक्टर्स आणि नर्सेस) मानधनात कपात? खरं तर सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या सेवेचं मोलच होऊ शकत नाही इतकी मेहनत ते करत आहेत. त्यांच्या परिश्रमाच मोल त्यांना अधिक भत्ता देऊन करायला हवं, मानधन कमी करून नाही.

अमित ठाकरे म्हणाले की, आणीबाणीच्या काळात डॉक्टर देवदूत असल्याचा अनुभव सर्वांना येत आहे. राज्यातील डॉक्टरांचे कितीही आभार मानले तरी अपुरेच आहेत. शासकीय सेवेतील डॉक्टर निष्ठेनं काम करत आहेत. या डॉक्टरांना देण्यात येणारं मानधनात कपात करणं हे कोणत्याच दृष्टीनं पटणारं नाही असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

कोरोनाच्या लढाईत सगळ्यात जास्त जीव धोक्यात घालून लढणाऱ्या आरोग्य सेवकांच्याच( बंधपत्रित डॉक्टर्स आणि नर्सेस) मानधनात... Posted by Amit Thackeray on Tuesday, 19 May 2020

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आरोग्य सेवा आयुक्तालयानं 20 एप्रिलला काढलेल्या आदेशानुसार बंधपत्रिक वैद्यकिय अधिकाऱ्यांचे मानधन 55 ते 60 हजार इतकं निश्चित केलं आहे. त्याआधी हेच मानधन 87 हजार इतकं मिळत होतं. नव्या आदेशानुसात सुमारे 20 हजार रुपये कपात होणार आहे. यामुळे डॉक्टरांच्या मनात असंतोषाचं वातावरण असून ही मानधन कपात अन्यायकारक असल्याचंही अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

हे वाचा : शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुचवले 8 महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्र राज्य सरकारकडून तितक्या उदारपणाची अपेक्षा नसली तरी डटक्टरांच्या वेतनात कपात होणार नाही याबाबत राज्य सरकारनं काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांना पुर्वीचेच वेतेन देण्याबाबत आपण त्वरीत कार्यवाही करावी नाहीतर कोरोनाविरोधात लढणारे डॉक्टर्स आणि नर्सेस हे योद्धे आहेत या आपल्या विधानाला कोणताही अर्थ उरणार नाही असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं.

हे वाचा : राज्य सरकारनं जाहीर केली नवीन नियमावली; मॉल्स, दुकानं होणार सुरू पण...

First published:
top videos

    Tags: Coronavirus