नुपूर पाटील, प्रतिनिधी डोंबिवली, 22 मार्च : नव्या वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडव्याला सर्वत्र उत्साहात सुरुवात झाली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज्यभरात शोभायात्रा काढल्या जात आहेत. डोंबिवलीमधील शोभायात्रा ही विशेष असते. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण डोंबिवली शहर आजच्या दिवशी शोभायात्रेत सहभागी होतं. डोंबिवलीतील शोभयात्रेचे या वर्षी रौप्य मोहोत्सव आहे. यावर्षी वसुधैव कुटुंबकम ही या शोभायात्रेची थीम आहे श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे ही गुढीपाडव्याची शोभायात्रा दरवर्षी आयोजित केली जाते. या शोभायात्रेमध्ये वेगवेगळे ग्रुप सहभागी झाले आहेत. यामध्ये डोंबिवली रनर्स ग्रुप हा सर्वात जुना ग्रुप आहे. तुळजापुरात गुढीपाडव्याचा उत्साह; तुळजाभवानी मंदिरात उभारली गुढी, पाहा खास फोटो डोंबिवली रनर्स ग्रुपच्या माध्यमातून आरोग्याविषयी जनजागृती करण्यात येते. ज्या चौकात शोभायात्रा थांबते तेथे आरोग्य कसे जपावे या विषयी माहिती दिली जाते तसेच. विविध योगासने केले जातात. तसेच या ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जातात. हा ग्रुप डोंबिवलीच्या शोभायात्रेत आकर्षणाचा विषय ठरला. गुढी पाडव्यानिमित्त विठ्ठल रखुमाई सजली, मंदिराला आकर्षक सजावट आजच्या धावपळीच्या युगात स्वतःच आरोग्य जपणे खूप महत्त्वाचं आहे. रोजच्या धावपळीत या महत्त्वाच्या गोष्टीकडं अनेकांचं दुर्लक्ष होतं. त्यामुळे वेगवेगळे आजार वाढतात. हे आजार दूर ठेवण्यासाठी आरोग्यबाबत जागृती करणे आवश्यक आहे. आम्ही योगासनं आणि प्राणायामच्या माध्यमातून ही जागृती करतो, असं डोंबिवली रनर्स ग्रुपच्या सदस्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.