मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Gudi Padwa 2023 : गिरगावकर भव्य शोभायात्रेनं करणार नव्या वर्षाचं स्वागत, पाहा काय आहे आकर्षण, Video

Gudi Padwa 2023 : गिरगावकर भव्य शोभायात्रेनं करणार नव्या वर्षाचं स्वागत, पाहा काय आहे आकर्षण, Video

X
gudi

gudi padwa 2023 : गिरगावचा गुढीपाडवा मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. यावर्षी शोभायात्रेचे आकर्षण काय असणार आहे जाणून घ्या.

gudi padwa 2023 : गिरगावचा गुढीपाडवा मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. यावर्षी शोभायात्रेचे आकर्षण काय असणार आहे जाणून घ्या.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Jalna, India

  धनंजय दळवी, प्रतिनिधी

  मुंबई, 20 मार्च : हिंदू नववर्षाची सुरूवात म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा सण यावर्षी बुधवारी (22 मार्च) आहे. गुडीपाडव्याला मराठी संस्कृती दिमाखात मिरवण्याची आपली शतकांची परंपरा आहे. पारंपारिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश, मातीतील कसरती यांची ओळख करुन देणाऱ्या शोभायात्रांमध्ये सहभागी होऊन तरुणाई आपली नाळ या परंपरांशी जोडून ठेवत आहे. गुडीपाडव्याला मुंबईभरातील तरूणाई या दिवशी गिरगावमध्ये जमते. ढोला ताशाच्या गजरामध्ये आकर्षक रांगोळ्यांनी गिरगावमध्ये गुढीपाडवा शुभेच्छा देऊन हा सण साजरा केला जातो. दरवर्षी स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे गिरगावमध्ये गुढीपाडव्याचं आयोजन केलं जातं. यावर्षीही आयोजन करण्यात आले असून जय्यत तयारी सुरु आहे.

  कोणत्या संकल्पनेवर आधारित शोभायात्रा?

  प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही गिरगावातील फडके श्री गणेश मंदिरापासून हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रा अर्थात गिरगावचा पाडवा मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित यात्रेचे हे एकविसावे वर्ष आहे. यावर्षीची शोभायात्रा 'समर्थ भारत विश्व गुरु भारत' या संकल्पनेवर आधारित आहे. गिरगावातील फडके श्री गणेश मंदिरापासून गुडीपूजनाने सुरुवात होऊन योगेश ईस्वलकर यांनी साकारलेल्या बावीस फूट उंच आचार्य चाणक्य यांच्या हातात यात्रेची मुख्य गुढी असणार आहे.

  चित्ररथ यात्रेचा आकर्षण असणार

  पर्यावरण रक्षणाचा विचार करून ही प्रतिकृती यावर्षी कागदाचा वापर करून बनवण्यात आली आहे. तसेच स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचा भारताचे  शस्त्रास्त्र सामर्थ दाखवणारा चित्ररथ यात्रेचा आकर्षण असणार आहे. पारंपारिक वेशातील दुचाकीस्वार महिलांचे आदिशक्ती पथक, युवकांचे युवाशक्ती पथक, गिरगाव कला मंच तर्फे नयनरम्य संस्कार भारती रांगोळी त्याचप्रमाणे रंग शाखा तर्फे रांगोळ्यांच्या पायघड्या यात्रेच्या शेवटी यात्रेदरम्यान होणारा कचरा स्वच्छ करणारे संत गाडगेबाबा स्वच्छता पथक ही प्रतिवर्षीप्रमाणे यात्रेची वैशिष्ट्य असणार आहे.

  Gudi Padwa 2023 : गुढी कशी उभारावी? पाहा संपूर्ण पद्धत आणि मुहूर्त, Video

  प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा साडेतीन शक्तीपीठ यावरील चित्र यावर्षी यात्रेतील विशेष आकर्षण असणार आहे. तसेच ठाकूरद्वार नाका येथे नववर्ष संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी या सभेत गिरगावकरांना संकल्प देण्यासाठी मोटिवेशनल स्पीकर आणि लाईफ कोच इस्कॉनचे गौर गोपालदास हे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत, असं स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्रीधर आगरकर यांनी सांगितले.

  First published:
  top videos

   Tags: Gudi Padwa 2023, Local18, Mumbai