धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 18 मार्च : हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण घरोघरी गुढ्या उभारतात. या दिवशी गुढी पुढे तसेच दाराबाहेर सजावटीसाठी रांगोळी काढली जाते. यंदा तुम्ही गुढी पुढे तसेच दाराबाहेर कोणती रंगोळी काढू शकता हे रांगोळी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या इंद्रायणी देवाडिगा यांनी सांगितले आहे.
कोणत्या रांगोळी काढू शकता?
कोणत्याही सणाला रांगोळी काढण्याचे महत्त्व आहे. रांगोळी शिवाय सणासुदीची पूर्णता नसते. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारतात. या दिवशी घरोघरी गुढी उभारून गुढी पुढे तसेच दाराबाहेर मोठ्या रांगोळी काढल्या जातात. हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. ठिपक्यांची रांगोळी, मोराची सोपी रांगोळी, फुलांची रांगोळी अश्या विविध रांगोळी तुम्ही यंदा काढू शकतात, असं इंद्रायणी देवाडिगा यांनी सांगितले.
संस्कार भारती रांगोळी
यासोबतच गुढीपाडव्यानिमित्त पारंपारिक संस्कार भारती रांगोळी यंदा तुम्ही दाराबाहेर किंवा गुढी उभारलेल्या परिसरात काढू शकता. जर तुम्हाला रांगोळीची जास्त आवड असेल तर तुम्ही पोर्ट्रेट रांगोळीमध्ये मराठमोळी महिला तिच्या बाजूला गुढी आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा असा संदेश देखील लिहून रांगोळीच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकतात.
Gudi Padwa 2023 : पाडव्याला विशेष महत्त्व असलेली साखरेची गाठ कशी तयार होते? पाहा Video
संस्कार भारतीमध्ये विविध रंगाच्या छटा वापरून त्यावर उठाव म्हणून चक्री, शंख, फुलं विविध संस्कार भारती मधले प्रकार त्यामध्ये तुम्ही काढू शकतात. खऱ्या अर्थाने संस्कार भारती रांगोळी गोलाकार पद्धतीत काढली जाते. मात्र, सध्याच्या ट्रेननुसार त्रिकोणी चौकोनी किंवा जागेचा आकार प्रमाणे देखील संस्कार भारती काढली जाते. तुम्ही फुलांचा वापर करून देखील उत्कृष्ट अशी रांगोळी काढू शकता, असंही इंद्रायणी देवाडिगा यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gudi Padwa 2023, Local18, Mumbai, Rangoli