मोठी बातमी, विधान परिषद आमदारांच्या यादीतून काही नावं वगळणार?

मोठी बातमी, विधान परिषद आमदारांच्या यादीतून काही नावं वगळणार?

ही यादी राज्यपालांकडे 6 नोव्हेंबरला सुपूर्दही करण्यात आली आहे. मात्र, या यादीतून काही नावं आता वगळली जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी (Governor-appointed MLA)महाविकास आघाडीकडून 12 नावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ()यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. मात्र,  विधान परिषदेसाठी (vidhan parishad mla) या 12 नावांपैकी काही नावं वगळण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि राजू शेट्टी (raju shetty) यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता आहे.

अनेक महिन्यांपासून रखडलेली राज्यपाल विधान परिषद आमदारांची यादी अखेर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून तयार करण्यात आली. त्यानंतर ही यादी राज्यपालांकडे 6 नोव्हेंबरला सुपूर्दही करण्यात आली आहे. मात्र, या यादीतून काही नावं आता वगळली जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे.  दैनिक दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यपालांकडून 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंजूर होण्याची शक्यता आहे. पण, यात तांत्रिक मुद्दे उपस्थितीत केले जाण्याची शक्यता आहे.

ना सचिन, ना विराट; केवळ 'या' एका भारतीय खेळाडूला फॉलो करतं instagram

एकनाथ खडसे हे नुकतेच भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहे. तर राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहे. दोन्ही नेते भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक आहे. त्यामुळेच तांत्रिक कारण देऊन दोन्ही नेत्यांचा पत्ता कट केली जाण्याची शक्यता आहे.

LIC ची अशी योजना ज्यात एकदाच भरावा लागेल हप्ता, आयुष्यभरासाठी दरमहा मिळतील 19000

राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी  कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा व सहकार क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तीची शिफारस करण्यात येत असते. एकनाथ खडसे यांची शिफारस ही सहकार क्षेत्रातून करण्यात आली आहे. त्यामुळे खडसेंच्या नावावर आक्षेप ठेवण्याची शक्यता आहे.

 राज्यपालांना दिलेल्या यादीतील नावे

शिवसेना उमेदवार

- उर्मिला मातोंडकर

- नितीन बानगुडे पाटील

- विजय करंजकर

- चंद्रकांत रघुवंशी

राष्ट्रवादी काँग्रेस

- एकनाथ खडसे

- राजू शेट्टी

- यशपाल भिंगे

- आनंद शिंदे

 काँग्रेस

- सचिन सावंत

- रजनी पाटील

- मुजफ्फर हुसैन

- अनिरुद्ध वणगे

Published by: sachin Salve
First published: November 14, 2020, 2:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या