LIC ची अशी योजना ज्यात एकदाच भरावा लागेल हप्ता, आयुष्यभरासाठी दरमहा मिळतील 19000

LIC च्या 'जीवन अक्षय' (Jeevan Akshay) पॉलिसीमध्ये तुम्ही एकदाच पैसे गुंतवून आयुष्यभर कमाई करू शकता.

  • Share this:

एलआयसी (LIC) ग्राहकांच्या सुरक्षेसाठी नवनवे प्लॅन्स लाँच करत असते. कंपनीने नुकताच एक खास प्लॅन सुरू केला आहे. या योजनअंतर्गत तुम्ही एकदाच पैसे गुंतवून आयुष्यभर कमाई करू शकता. या योजनेचे नाव 'जीवन अक्षय' (Jeevan Akshay) आहे. ज्या लोकांना वृद्धापकाळात पेन्शनची चिंता आहे, त्यांच्यासाठी ही योजना बेस्ट आहे. हा प्लॅन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने खरेदी केला जाऊ शकतो.

काय आहे LIC ची ही योजना?-LIC ची या पॉलिसीची योजना जीवन अक्षय-7 (प्लॅन नंबर 857) आहे. ही सिंगल प्रीमियम वाली नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल अ‍ॅन्यूटी योजना आहे. ही पॉलिसी 25 ऑगस्ट 2020 पासून सुरू झाली आहे.

कोण खरेदी करू शकतो ही योजना?- ही योजना 30 ते 85 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती खरेदी करू शकते. दिव्यांगजनांना फायदा मिळवण्यासाठी देखील ही योजना खरेदी केली जाऊ शकते.

पॉलिसी जारी झाल्यानंतर तीन महिन्यांनी लोन सुविधा देखील मिळते. अर्थात या कालावधीनंतर पॉलिसीधारक कर्ज घेऊ शकतात.

कमीतकमी 12 हजार Annuity ही पॉलिसी तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहा महिन्यांसाठी किंवा एका वर्षाच्या अ‍ॅन्यूटी मोडमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये ग्राहकांना कमीतकमी 12 हजार अ‍ॅन्यूटी मिळू शकते. LIC च्या या पॉलिसीची खासियत अशी आहे की, गुंतवणूक करताना पॉलिसीधारक पेन्शनसाठी 10 वेगवेगळे पर्याय निवडू शकतो. आवश्यकतेनुसार हे पर्याय निवडता येतील. यापैकी एक 'Annuity Payable for life at a uniform rate' (दरमहा पेन्शन पर्याय A) हा देखील आहे.

कसे मिळतील महिना 19 हजार?- या पॉलिसीमध्ये तुम्ही कमीतकमी 1,00,000 रुपये गुंतवू शकता. तर जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणती मर्यादा नाही आहे. उदाहरणार्थ वयाच्या 32व्या वर्षी जर तुम्ही ही गुंतवणूक केली तर दरमहा 19000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी एकरकमी 4072000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल यामध्ये सम अश्योर्ड 4000000 रुपये, एकरकमी प्रीमियम- 4072000 रुपये असेल. यामध्ये तुम्हाला वार्षिक पेन्शन 234800 रुपये, अर्धवार्षिक पेन्शन 115600 रुपये, तिमाही पेन्शन 57350 रुपये आणि मासिक पेन्शन 19000 रुपये असेल.

पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर ही पेन्शन मिळणे बंद होईल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 14, 2020, 2:25 PM IST
Tags: money

ताज्या बातम्या