दिवाळीत आली Good News,  कोरोना रुग्णांची संख्या 7 महिन्यात सर्वात कमी

दिवाळीत आली Good News,  कोरोना रुग्णांची संख्या 7 महिन्यात सर्वात कमी

तर देशात दिवसभरात 41,100 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशाची एकूण रुग्ण संख्या ही 88,14,579 एवढी झाली आहे.

  • Share this:

मुंबई 15 नोव्हेंबर: ऐन दिवाळीत  (Diwali)राज्याला दिलासा देणारी बातमी आली आहे. गेल्या सलग काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा (Corona Patient in Maharashtra )आलेख घसरतो आहे. तो कायम असून रविवारी (16 नोव्हेंबर)ला पाडव्याच्या दिवशी गेल्या 7 महिन्यातले सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 2,544 नवे रुग्ण आढळले तर 3,065 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 60 जणांचा मृत्यू झाला. बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही आता 16,15,379वर गेली असून. मृत्यूचा आकडा हा 45,974 एवढा झाला आहे. तर राज्याचा Recovery Rate 91.45वर गेला आहे.

तर देशात दिवसभरात 41,100 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशाची एकूण रुग्ण संख्या ही 88,14,579 एवढी झाली आहे. तर 447 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूसंख्या ही 1,29,635 वर गेलीय. तर तब्बल 42,156 जणांनी कोरोनावर मात केली.

दरम्यान,  एकदा कोरोना लस बाजारात आली की, काही कंपन्या कोरोनाची बनावट लस बनवून लोकांना लुबाडू शकतात. असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी जगातील सर्व नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. independent.co.uk च्या रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी बनावट लस बनवणाऱ्या कंपन्यांचा तपास करायलादेखील सुरूवात केली आहे.

ज्याप्रमाणे कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात बनावट पीपीई कीट, सॅनिटायझरचा व्यवासय सुरू झाला होता तसंच वापरलेले मास्क, हँड ग्लोव्ह्ज पुन्हा विकण्याचे प्रकार उघडकीस आले होते, त्याप्रमाणे कोरोनाची बनावट लसही येण्याची शक्यता आहे.

भारतीयांना बहुतेक कोरोना लशीची गरज पडणार नाही? डॉक्टरांनी केला दावा

ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीमधील इकोनॉमिक क्राइम सेंटरच्या डायरेक्टर जनरल ग्रॅम बिगर यांचा दावा आहे की, ‘बनावट कोरोना लशीचं मोठं रॅकेट जगभरात पसरण्याची शक्यता आहे. कोरोनावर जशी लस तयार होईल तसा बोगस लस बनवणाऱ्यांचा धंदाही तेजीत येईल.’ अशा ठगांना रोखण्यासाठी आपण आधीपासूनच तयारी केली पाहिजे. एका ब्रिटीश अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, ‘कोरोनावर ज्या कंपन्या लस शोधत आहेत त्यांना सायबर हल्ल्यांना सामोरं जावं लागलं आहे.

मास्क धुवून उन्हात ठेवला तर 99.99 टक्के कोरोनाचे विषाणू नष्ट होतात?

अमेरिका आणि ब्रिटनमध्ये असे प्रकार घडले आहेत.’ त्यामुळे कोरोना लस बाजारात येईल तेव्हा थोडे कमी पैसे देऊन बनावट लस घेण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसराच घेणं फायदेशीर ठरणार आहे. कोरोना लस घेताना ती योग्य आहे की बनावट यामध्ये ग्राहकांनीही जागृक असणं गरजेचं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 15, 2020, 7:32 PM IST

ताज्या बातम्या