मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

मास्क धुवून उन्हात ठेवला तर 99.99 टक्के कोरोनाचे विषाणू नष्ट होतात? काय आहे तज्ज्ञांचा दावा

मास्क धुवून उन्हात ठेवला तर 99.99 टक्के कोरोनाचे विषाणू नष्ट होतात? काय आहे तज्ज्ञांचा दावा

मास्क सूर्यप्रकाशात ठेवला तर त्या कापडावर जमा झालेले 99. 99 टक्के जीवाणू आणि विषाणू नष्ट होतील असा संशोधकांचा दावा आहे.

मास्क सूर्यप्रकाशात ठेवला तर त्या कापडावर जमा झालेले 99. 99 टक्के जीवाणू आणि विषाणू नष्ट होतील असा संशोधकांचा दावा आहे.

मास्क सूर्यप्रकाशात ठेवला तर त्या कापडावर जमा झालेले 99. 99 टक्के जीवाणू आणि विषाणू नष्ट होतील असा संशोधकांचा दावा आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

लॉस अँजेलिस, 13 नोव्हेंबर: कोरोना विषाणूची महामारी जगभर पसरून आता एक वर्ष होत आलं आहे. औषध आणि लस तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. तोपर्यंत मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग, वारंवार हात धुणं हेच कोरोनापासून बचावाचे पर्याय आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकानी एक असं सुती कापड तयार केलंय ज्याचा मास्क वापरला तर तो मास्क केवळ एक तास सूर्यप्रकाशात ठेवून निर्जंतुक करता येणार आहे. हा मास्क सूर्यप्रकाशात ठेवला तर त्या कापडावर जमा झालेले 99. 99 टक्के जीवाणू आणि विषाणू नष्ट होतील असा संशोधकांचा दावा आहे. वेगवेगळ्या कापडांपासून मास्क तयार होतात त्यात आपण खोकतो, शिंकतो त्यामुळे कोविडचा प्रसार कमी होतो. एसीएस अप्लाइड मेटिरयल अँड इंटरफेसेज या जर्नमलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार मास्कवर चिकटलेले जीवाणू आणि विषाणू संसर्गजन्य असतात.

कशामुळे मरतात जीवाणू, विषाणू?

कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी रोज बंगाल डाय कापडापासून हा मास्क तयार केला आहे. हे कापड सूर्यप्रकाशात आलं की फोटोसॅनिटायझरचं काम करतं. साधारण एक तास हे कापड सूर्यप्रकाशात राहिलं की ते Reactive Oxygen Spices (ROS) उत्सर्जित करतं ज्यामुळे कापडावरचे सूक्ष्म विषाणू आणि जीवाणू मरतात. त्यामुळे तो मास्क धुण्यायोग्य, पुन्हा वापरायला सुरक्षित होतो. हे कापड सूर्यप्रकाशात आल्यावर 30 मिनिटांत टी 7 बॅक्टेरिया फेजला सक्रिय करतं. टी 7 बॅक्टेरियाफेज हा विषाणू कोरोना विषाणूच्या तुलनेत ORS साठी अधिक रोगप्रतिकारक आहे.

हे वाचा-एका डेटसाठी अख्खं रेस्टॉरंटचं घेतलं भाड्यानं,गर्लफ्रेंडला 2 वर्षांनंतर कळलं सत्य

दुसऱ्या एका संशोधनात अमेरिकेतील 1600 हून अधिक कोविड-19 रुग्णांची माहिती संशोधकांनी अभ्यासली त्यात असं दिसलंय की कोरोनाचा दीर्घकालीन परिणाम शरीरावर होतो.

38 रुग्णालयांतील 1600 रुग्ण झाले अभ्यासात सहभागी

या संशोधकांत अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठांतील संशोधकांचाही समावेश होता. त्यांनी मिशिगनमधील 38 रुग्णालयांतील 1648 कोविड-19 रुग्णांच्या माहितीचं विश्लेषण केलं. ज्यातून त्यांना लक्षात आलं की 398 जणांता रुग्णालयात मृत्यु झाला. 1250 जण वाचले. 488 रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 60 दिवसांनी त्यांची मुलाखत घेतल्यावर संशोधकनांना लक्षात आलं की त्यापैकी 39 टक्के रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवल्यानंतर दोन महिन्यांनीही त्यांची दैनंदिन कामं करता येत नाहीएत. अनल्स ऑफ इंटरनल मेडिसीन या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.

First published:

Tags: Coronavirus, Symptoms of coronavirus