मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

भारतीयांना बहुतेक कोरोना लशीची गरज पडणार नाही? AIIMS च्या डॉक्टरांनी केला दावा

भारतीयांना बहुतेक कोरोना लशीची गरज पडणार नाही? AIIMS च्या डॉक्टरांनी केला दावा

कोरोना अजून संपलेला नाही आणि नागरिकांनी याचं भान ठेवायला हवं असंही गुलेरिया म्हणाले.

कोरोना अजून संपलेला नाही आणि नागरिकांनी याचं भान ठेवायला हवं असंही गुलेरिया म्हणाले.

कोरोना अजून संपलेला नाही आणि नागरिकांनी याचं भान ठेवायला हवं असंही गुलेरिया म्हणाले.

  • Published by:  Kranti Kanetkar
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून भारतात कोरोनाचं संक्रमण होण्याचं प्रमाण घटत चाललं आहे. कोरोनाग्रस्तांचं कमी होणारं प्रमाण पाहून एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी थोडाचा सुटकेचा निश्वास टाकला. देशात कोरोनाची लस येण्याआधीच भारतीयांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लागणारी इम्युनिटी तयार होईल असा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे. एकीकडे दिल्लीसह 7 राज्यांमध्ये दिवाळी, प्रदूषण आणि एकूण परिस्थिती पाहता कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. तर थंडीमुळे पुन्हा एकदा जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगानं वाढू शकतो असं काही तज्ज्ञांचं म्हणणं असतानाच एम्सच्या डॉक्टरांनी काहीशी दिलासा देणारी माहिती दिली आहे. कोरोनाबद्दल माहिती देताना एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, आपण ज्या प्रकारचा ट्रेंड पाहत आहोत, ते पाहिल्यानंतर आपण असे म्हणू शकतो की देशात कोव्हिडची लस येण्याआधी भारतीयांची प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकते. कोरोनाचे स्वरुप बदलणार नाही. गुलेरिया म्हणाले की, येत्या काळात आपण अशा टप्प्यावर पोहोचू शकतो जेथे देशातील नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती इतकी वाढू शकते की त्यांना लसीची गरज देखील भासेल की नाही याबाबत शंका आहे. हे वाचा-कोरोनामुळे फुफ्फुसांमध्ये होतात रक्ताच्या गुठळ्या, संशोधनातून नवीन माहिती समोर डॉ. गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाग्रस्तांची होणारी घट ही दिलासा देणारी बाब आहे. पण येत्या काळात थंडीचा कडाका वाढला आणि प्रदूषण जास्त असेल तर कोरोनाचे विषाणू हवेत अधिक काळ जिवंत राहू शकतात आणि वेगानं पसरण्याचा धोका देखील आहे. कोरोना अजून संपलेला नाही आणि नागरिकांनी याचं भान ठेवायला हवं असंही गुलेरिया म्हणाले. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. देशात गेल्या 24 तासांत 44 हजार 684 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत हा आकडा 87,73,479 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 520 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 4 लाख 80, 719 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या 3 हजार 828ने कमी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
First published:

Tags: Coronavirus, Symptoms of coronavirus

पुढील बातम्या