मुंबई, 21 जुलै : गेल्या दोन वर्षांपासून राज्यावर कोरोनाचं (Coronavirus) सावट होतं. त्यामुळे राज्यात आयोजित केल्या जाणाऱ्या सण-उत्सव साजरा करण्यावर निर्बंध लावण्यात आले होते. दरम्यान आता राज्यात गणेशोत्सव आणि दहीहंडी धुमधडाक्यात साजरा होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. (Restrictions on Ganeshotsav and Dahi Handi removed) शिंदे आणि फडणवीस सरकारने (Shinde and Fadanvis Government ) गणेशोत्सव आणि दहीहंडीवरील निर्बंध हटवल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे या वर्षी नागरिकांना उत्साहात गणेशोत्सव आणि दहीहंडी साजरा करण्यात येणार आहे. यासाठी एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश देण्यात आले असूम परिवहन विभागास वाहतूक नियोजनाचे आदेश देण्यात आले आहे. प्रमुख महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महामार्ग पोलिसांना ही सूचना जाहीर करण्यात आली आहे. राज्यात दहिहंडी आणि गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरे होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सावाचं वातावरण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.