मुंबईकरांसाठी खुशखबर, 'बेस्ट' ने घेतला एक बेस्ट निर्णय

मुंबईकरांसाठी खुशखबर, 'बेस्ट' ने घेतला एक बेस्ट निर्णय

मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. आता बेस्टच्या प्रवासाचे दर कमी होणार आहेत.बेस्टचे माजी कर्मचारी, मुंबई पोलीस, स्वातंत्र्यसैनिक, दिव्यांग व्यक्ती यांना आता एसी बसमध्ये सुद्धा मोफत प्रवास करता येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जून : मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. आता बेस्टच्या प्रवासाचे दर कमी होणार आहेत. बेस्टचं भाडं कमी करण्याचा हा प्रस्ताव बेस्ट समितीमध्ये मंजूर करण्यात आला. आता हा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या सभागृहाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. हे 'बेस्ट' दर लवकरच लागू होतील. त्यानुसार, बेस्टचं किमान भाडं 8 रुपयांवरून 5रुपयांवर येणार आहे. बेस्टच्या साध्या बसचं जास्तीत जास्त भाडं 20 रुपये असेल.बेस्टच्या एसी बसचं किमान भाडं 20 रुपयांवरुन 6 रुपयांवर येणार आहे तर जास्तीत भाडं 25 रुपयांवर येणार आहे.

मोफत प्रवास

बेस्टचे माजी कर्मचारी, मुंबई पोलीस, स्वातंत्र्यसैनिक, दिव्यांग व्यक्ती यांना आता एसी बसमध्ये सुद्धा मोफत प्रवास करता येणार आहे.

World Cup : वॉर्नर सर्व सामन्यात खेळावा म्हणून ऑस्ट्रेलियाने घेतली खास काळजी!

बेस्टच्या प्रवाशांसाठी खुशखबर असली तरी मुंबईत टॅक्सी आणि रिक्षाचं भाडं मात्र वाढणार आहे. त्यामुळे टॅक्सी आणि रिक्षाने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाचा भार मात्र वाढणार आहे.

आदित्य ठाकरेंचं ऑल द बेस्ट

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बेस्टच्या कार्यालयात आले होते.मुंबईकरांचा मुंबईकरांचा प्रवास कमी दरात आणि सुखकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले.

बेस्टच्या नव्या बस वाढवायच्या आहेत.त्याचबरोबर प्रवासाचा खर्च कमी करायचा आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. मी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ऑल द बेस्ट म्हणायला आलो आहे, असंही ते म्हणाले.

===============================================================================================

VIDEO : ब्रायन लाराची प्रकृती बिघडली, मुंबईतील रुग्णालयात केलं दाखल

First published: June 25, 2019, 6:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading