मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /रक्ताचा टिळा लावून केलं प्रेमाचं नाटक; विवाहित तरुणाचे तरुणीवर लैंगिक अत्याचार

रक्ताचा टिळा लावून केलं प्रेमाचं नाटक; विवाहित तरुणाचे तरुणीवर लैंगिक अत्याचार

विवाहित (Married) असूनही एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात (Love Trap) ओढून तिच्यावर लैंगिक संबंध (Sexual relation) ठेवल्याची धक्कादायक घटना ठाण्यात उघडकीस आली आहे.

विवाहित (Married) असूनही एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात (Love Trap) ओढून तिच्यावर लैंगिक संबंध (Sexual relation) ठेवल्याची धक्कादायक घटना ठाण्यात उघडकीस आली आहे.

विवाहित (Married) असूनही एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात (Love Trap) ओढून तिच्यावर लैंगिक संबंध (Sexual relation) ठेवल्याची धक्कादायक घटना ठाण्यात उघडकीस आली आहे.

ठाणे, 12 जुलै: विवाहित (Married) असूनही एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात (Love Trap) ओढून तिच्यावर लैंगिक संबंध (Sexual relation) ठेवल्याची धक्कादायक घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. आरोपी तरुणानं लग्न (Marriage) झाल्याची माहिती तरुणीपासून लपवून तिला लग्नाचं आणि नोकरी मिळवून देण्याच आमिष (Lure of marriage and job) दाखवत वेळोवेळी बलात्कार (Rape) केला आहे.

अनैतिक संबंधातून पीडित तरुणी गर्भवती (Pregnant) राहिल्यानंतर आरोपीनं गर्भपात करण्यासाठी तरुणीवर दबाव आणला, त्याचबरोबर गर्भपात न केल्यास भावाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. याप्रकरणी पीडितने ठाणे पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

कामेश मरोठीया असं गुन्हा दाखल झालेल्या 28 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव असून तो ठाण्यातील चिरागनगर परिसरातील रहिवासी आहे. आरोपी कामेशचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं असून तो एका खाजगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. दरम्यान 14 जून 2020 मध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्यानं आरोपीनं 24 वर्षीय तरुणीशी जवळीक साधली. याच ओळखीतून आरोपीनं पीडितेवर प्रेम असल्याचं भासवलं. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांशी देखील ओळख वाढवली.

हेही वाचा-नागपूरात महिला कितपत सुरक्षित? महिन्याला सरासरी इतक्या महिलांवर होतोय अत्याचार

लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेच्या वाढदिवशी आरोपीनं तिला एकांतात भेटून स्वतःच्या रक्ताचा टिळा लावत प्रेम व्यक्त केलं. तसेच आजपासूनच आपण तुला बायको म्हणून स्विकारलं असल्याची बतावणी केली. तसेच लवकरच आपण लग्न करू असं आमिषही दाखवलं. यानंतर आरोपीनं अनेकदा पीडितेला घरी बोलावून तिच्यासोबत जबरदस्तीनं लैंगिक संबंध ठेवले. यातून पीडित तरुणी गर्भवती राहिली.

हेही वाचा-पुणे: KISS करताना रोखल्यानं भडकल्या तरुणी; केअर टेकरला मारहाण करत तोडला दात

आपलं बिंग फुटेल या भीतीनं आरोपीनं पीडितेवर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला. तसेच भावाला ठार मारण्याची धमकीही दिली. गर्भपात करण्यास सहमती मिळवल्यानंतर आरोपीनं तिचा विश्वासघात केला. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेनं वर्तकनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात लैंगिक अत्याचार, धमकी आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी 10 जुलै रोजी आरोपी कामेशला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Rape, Thane