मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /नायर रुग्णालयातील तरुण डॉक्टराच्या आत्महत्येचे गुढ उकलले, धक्कादायक कारण आले समोर

नायर रुग्णालयातील तरुण डॉक्टराच्या आत्महत्येचे गुढ उकलले, धक्कादायक कारण आले समोर

अवघ्या 26 व्या वर्षी डॉ. भिमसंदेश प्रल्हाद तुपे यांनी टोकाचे पाऊल उचलले होते. 15 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या खोलीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता.

मुंबई, 02 मार्च :  मुंबईतील प्रसिद्ध नायर रुग्णालयामध्ये (Nair Hospital) एका तरुण डॉक्टराने वयाच्या अवघ्या 26 वर्षी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणाचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रेयसीचे लग्न ठरल्यामुळे डॉ. भिमसंदेश प्रल्हाद तुपे (Dr. Bhimsandesh Pralhad Tupe) यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

अवघ्या 26 व्या वर्षी डॉ. भिमसंदेश प्रल्हाद तुपे यांनी टोकाचे पाऊल उचलले होते. 15 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या खोलीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता.

सॅलड खाताना आवर्जून टाळा या चुका, नाहीतर हेल्दी फूडचा होईल भलताच परिणाम

डॉ. भिमसंदेश प्रल्हाद तुपे हे 3 दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये जाऊन आले होते. त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने ते औरंगाबादेत गेले होते, तीनच दिवसांनी तुपे असं पाऊल उचलतील असं कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. सोमवारी त्यांनी दिवसभर काम देखील केलं. संध्याकाळी त्यांनी त्यांच्या खोलीमध्ये जाऊन इंजेक्शन घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा तपासाअंती धक्कादायक माहिती समोर आली. भिमसंदेश तुपे यांचं एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. पण, प्रेयसीच लग्न दुसऱ्याशी ठरल्यामुळे भिमसंदेश तुपे यांनी आत्महत्या केली.

सहजसोपे उपाय करून सुंदर त्वचा मिळवायची आहे? हे टोमॅटोचे फेसपॅक आहेत मस्त

तुपे यांचं ज्या महिलेवर प्रेम होतं ती नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. हे दोघे MBBSचं शिक्षण घेत होते. जिथे या दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं होतं. पुढील अभ्यासासाठी तुपे हे मुंबईत आले आणि महिला नागपूर मध्ये शिक्षण घेऊ लागली. डॉ. तुपे हे अॅनेस्थेशिया विभागात एमडीचे शिक्षण घेत होते.  त्यानंतर दोघे फोन आणि मॅसेज वर एकमेकांच्या संपर्कात होते. पण, अचानक प्रेयसीचे लग्न ठरले अशी बातमी त्यांच्या कानी पडली. त्यातून नैराश्य आल्यामुळे तुपे यांनी आत्महत्या केली.

First published:

Tags: Crime, Mumbai, Nair hospital, Suicide