मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सहजसोपे उपाय करून सुंदर त्वचा मिळवायची आहे? हे टोमॅटोचे फेसपॅक आहेत मस्त

सहजसोपे उपाय करून सुंदर त्वचा मिळवायची आहे? हे टोमॅटोचे फेसपॅक आहेत मस्त

अनेक घरगुती गोष्टी वापरून त्वचा स्वच्छ आणि तरुण ठेवता येते. यातलीच एक गोष्ट म्हणजे टोमॅटो.

अनेक घरगुती गोष्टी वापरून त्वचा स्वच्छ आणि तरुण ठेवता येते. यातलीच एक गोष्ट म्हणजे टोमॅटो.

अनेक घरगुती गोष्टी वापरून त्वचा स्वच्छ आणि तरुण ठेवता येते. यातलीच एक गोष्ट म्हणजे टोमॅटो.

मुंबई, 2 मार्च: टोमॅटो आरोग्यासह त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. याचा वापर अनेक फेस पॅक्समध्येही केला जातो. फेस पॅक्स त्वचेत चमकदारपणा आणतात. (tomato for skin care)

सोबतच त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यातही टोमॅटो प्रभावी ठरतो. अँटिऑक्सिडंट, अँटिबॅक्टेरियल आणि अँटीफंगल, व्हिटॅमिन सी, लायकोपिन असे अनेक एलिमेंट्स टोमॅटोमध्ये असतात. (tomato benefits for soft and glowing skin)

टोमॅटो चेहऱ्यावरची काळी वर्तुळं दूर करतं. चेहऱ्यावरचे इतरही डाग साफ करण्यासाठी टोमॅटो प्रभावी ठरतो. चेहऱ्याला एकदम सुंदर, ताजा बनवतो. टोमॅटोपासून बनवता येतील असे काही फेस पॅक कुठले हे समजून घ्या. (tomato face packs for skin care)

टोमॅटो आणि लिंबू फेस पॅक(tomato and lemon face pack)

टोमॅटो आणि लिंबू हे दोन्ही प्रभावी आणि नैसर्गिक क्लिंजर आहेत. यादोन्हीपासून बनवलेला फेसपॅक तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवण्यात मदतशील ठरतो. हा त्वचेवरचं विनागरजेचं असं तेल काढून टाकतो. हा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्ही टोमॅटो वाटून त्यात एक लहान चमचा लिंबाचा रस आणि तेवढाच मध टाका. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावून दहा मिनिट ठेवा. सुकल्यावर धुवून टाका.

टोमॅटो आणि मधाचा फेस पॅक

चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी टोमॅटो आणि मध दोन्ही अतिशय महत्त्वाचे आहेत. या दोन्हींना मिसळून फेसपॅक बनवला तर यातून त्वचेला खूप फायदा मिळेल. यातून त्वचा पूर्ण स्वच्छ होईल. सोबतच मुलायमपणाही येईल. हा फेसपॅक बनवण्यासाठी एक टोमॅटो मॅश करून घ्या. यात एक चमचा मध मिसळा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. दहा-पंधरा मिनिटांनी पाण्यानं धुवा.

हेही वाचा Organic Skincare किती फायदेशीर? जाणून त्याचे 5 गैरसमज!

टोमॅटो आणि साखरेचा फेस पॅक

त्वचा स्वच्छ करण्यासह तिचा मुलायमपणा कायम ठेवण्यास टोमॅटो मॅश करून त्याचा रस काढून घ्या. आता या रसात एक चमचा साखर मिसळा. हळूहळू चेहऱ्यावर घासा. काहीवेळ हा पॅक चेहऱ्यावर तसाच ठेवा आणि चेहरा पाण्यानं धुवून घ्या.

(Disclaimer - या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. news 18 Marathi याला दुजोरा देत नाही. यांच्यावर अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञांशी संपर्क करा.)

First published:

Tags: Beauty tips