जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय संजय पांडेंना ईडीकडून अटक

BREAKING : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय संजय पांडेंना ईडीकडून अटक

BREAKING : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय संजय पांडेंना ईडीकडून अटक

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 जुलै : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय पांडे यांना फोन टॅपिंग प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय पांडे हे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठीदेखील हा धक्का आहे. दरम्यान, NSE कर्मचाऱ्यांच्या फोन टॅप प्रकरणी संजय पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संजय पांडे यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅप केला होता, असा त्यांच्यावर आरोप होता. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ते राज्याचे पोलीस महासंचालक देखील होते. पण काही तांत्रिक आणि कायदेशीरबाबींमुळे त्यांची पोलीस महासंचालक पदावरुन मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते नुकतेच तीन दिवसांपूर्वी 30 जूनला मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन निवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांना ईडीने नोटीस पाठवल्याची बातमी समोर आली होती. विशेष म्हणजे ईडीने आज पांडे यांची चौकशी केली. या चौकशीनंतर ईडीने पांडे यांना अटक केली आहे. नेमकं प्रकरण काय? NSE घोटाळा प्रकरणी  कंपनीचे टॉप मॅनेजमेंटमधील अधिकारी चित्रा रामकृष्ण, रवी नारायण आणि आनंद्र सुब्रमण्यम यांना आरोपी बनवण्यात आलं होतं. तपासादरम्यान संजय पांडे यांच्या आयसेक नावाच्या कंपनीने 91 कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याचं उघड झालं होतं. या फोन टॅपिंगसाठी संजय पांडे यांच्या कंपनीला चित्रा रामकृष्ण आणि इतर मॅनेजमेंटने 4 कोटी 45 लाख रुपये दिले होते. याशिवाय 20 कोटींचे संशयास्पद व्यवहार आयसेक कंपनीतून झाल्याचं उघड झालं होतं. याचबाबत ईडीकडून तपास सुरु होता. अखेर याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर ईडीने पांडे यांना अटक केली आहे. ( युतीसाठी उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींसोबत बंद दाराआड एक तास चर्चा, खासदार राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट ) संजय पांडे यांनी दोन दशकांपूर्वी पोलीस सेवेतून निवृत्त होण्यासाठी राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी 2001 मध्ये स्वत:चं आयटी ऑडिट फर्म सुरु केलं होतं. या दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नव्हता. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत हजर राहावं लागलं. त्यावेळी संजय पांडे यांनी आपली आई आणि मुलाला फर्मचं संचालक केलं होतं. या फर्मचं Isec Services Pvt Ltd असं नाव होतं. या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. त्यावेळी फर्मने दिलेल्या अहवालात कोणतंही उल्लंघन झालेलं नाही, असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरुन CBI ने फर्मची चौकशी सुरु केली होती. या प्रकरणी आता ईडीदेखील चौकशी करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात