Home /News /mumbai /

फ्लिपकार्टने घेतला धसका; मनसेच्या इशाऱ्यानंतर दिलं आश्वासन

फ्लिपकार्टने घेतला धसका; मनसेच्या इशाऱ्यानंतर दिलं आश्वासन

...अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल, असा इशारा देण्यात आला होता

    मुंबई, 17 ऑक्टोबर : सात काही दिवसांपूर्वी मनसेने मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन फिल्पकार्ट आणि अॅमेझॉनला इशारा दिला होता. या कंपन्यांनी मराठीत अॅप आणलं नाही तर त्यांची दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर फ्लिपकार्टने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ग्राहकांना नवनवीन आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे स्वदेशी इ कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेली फ्लिपकार्ट भारतात इ-कॉमर्स सर्वदूर पोहोचवण्यासाठी; तसेच या उद्योगात लोकशाहीप्रमाणे काम करण्यास कटिबद्ध आहोत, असं फ्लिपकार्टने म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ड या दोन कंपन्यांना सात दिवसाची मुदत देण्यात आली होती. सात दिवसाच्या आत जर त्यांनी त्यांच्या अॅप मध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव केला नाही तर त्यांचा मनसे स्टाइल समाचार घेण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला होता. ज्याप्रमाणे या कंपन्यांनी दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य देऊन तिथे त्यांच्या भाषेत ॲप सुरू केले, तसेच महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत ॲप आणावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा दिवाळीचा सण मनसे स्टाईल साजरा करेल. असा इशारा देण्यात आला होता. हे ही वाचा-कंगनाचा पुन्हा पंगा: FIR नंतर राज्य सरकारला म्हणाली "पप्पू सेना" भाषेचाही पर्याय सध्या उपलब्ध असलेल्या भाषांव्यतिरिक्त अन्य भाषांचाही फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर समावेश असणार आहे. भारतात विविध भागात पोहोचण्यासाठी विविध भाषा आणि व्हॉइस सॉल्यूशनचा वापर फ्लिपकार्टकडून करण्यात येणार आहे. मातृभाषेच्या वापरामुळे मोठ्या संख्येने ग्राहक आकर्षित होतील, याशिवाय लघु व मध्यम उद्योजक आणि कारागिरांना एक मोठा बाजारपेक्ष उपलब्ध होईल, असे फ्लिपकार्टच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. 16 ऑक्टोबरपासून अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टचा महासेल सुरू झाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक वस्तुंवर येथे सवलती देण्यात आल्या आहेत. मात्र हे अॅप मराठीत का नाही? असा सवाल उपस्थित करीत मराठी भाषेतही कंपन्यांनी अॅप सुरू करावे, अशी मागणी मनसेने केली आहे. त्यानंतर आता फ्लिपकार्टने सकारात्मक आश्वासन दिलं आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Amazon, Flipkart, Raj thacarey

    पुढील बातम्या