Home /News /entertainment /

कंगनाचा पुन्हा पंगा: FIR नंतर राज्य सरकारला म्हणाली "पप्पू सेना"

कंगनाचा पुन्हा पंगा: FIR नंतर राज्य सरकारला म्हणाली "पप्पू सेना"

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangna Ranaut)विरोधात पुन्हा एकदा FIR दाखल होणार आहे. त्याबद्दल कंगनाने ट्वीट करत राज्य सरकारचा उल्लेख पप्पू सेना असता केला आहे.

    मुंबई, 17 ऑक्टोबर: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut)ने आता नवीन नाद ओढवून घेतला आहे. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने कंगना रणौत विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने असे म्हटले आहे की, हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे. धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप अभिनेत्रीवर करण्यात आला आहे. यासंदर्भात आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती.त्यावर गप्प न बसता कंगनाने पुन्हा एकदा आपला राग आळवला आहे. कंगनाने पुन्हा एकदा ट्वीट करत महाराष्ट्रातील सरकारचा उल्लेख "पप्पू सेना" असा केला आहे. एफआयआर प्रकरणी कंगनाने ट्वीट केलं आहे आज माझ्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. "महाराष्ट्रातील पप्पू सेना माझी खूपच आठवण काढत आहे. पण मला एवढं मिस करू नका मी लवकरच परत येणार आहे.  #नवरात्री" कंगनाने केलेल्या या ट्वीटला तिच्या चाहत्यांनी रिट्विट केलं आहे. वादग्रस्त वक्तव्य आणि ट्वीट करण्याची कंगनाची ही पहिली वेळ नाही. या आधीही कंगनाने सुशांत सिंह राजपूत प्रकरणातून बॉलिवूडमधील नेपोटिझमवर निशाणा साधला होता. विविध राजकीय  घडामोडींवरही कंगना व्यक्त होत असते. कंगनावर दाखल झालेली याचिका मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैयद यांनी दाखल केली आहे. याचिकेमध्ये असे म्हटले आहे की, कंगनाकडून सातत्याने बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून ते अगदी टीव्हीपर्यंत सर्व ठिकाणी ती बॉलिवूडविरोधात बोलत आहे. याबाबत कंगना विरोधात याचिका दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर कंगनाची चौकशी होण्याची शक्यता आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Kangana ranaut, Twitter

    पुढील बातम्या