अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबाने अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप लावले. यानंतर रिया चौकशीच्या घेऱ्यात आहे. आता रियाच्या करिअरवरही संकट आलं आहे.
रिया चक्रवर्तीला करिअरच्याबाबतीही मोठा धक्का मिळाला आहे. रिया एका फिल्ममध्ये दिसणार होती मात्र या फिल्मच्या दिग्दर्शकांनी तिला आता आपल्या फिल्ममध्ये घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रियावर अनेक आरोप आहेत आणि आपल्याला सुशांतच्या चाहत्यांच्या भावनाही दुखवायच्या नाहीत, आम्ही जनतेच्या भावनांचा आदर करतो, त्यामुळे आम्ही रियाला कास्ट करणार नाहीत, असं लोम हर्ष यांनी IANS बोलताना सांगितलं.
2018 पासूनच या फिल्मची तयारी सुरू झाली आहे. त्याचं प्री-प्रोडक्शनाचं काम झालं आहे, या वर्षापासूनच आम्ही शूटिंग करणार होतो मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे ते पुढे ढकलण्यात आला.
या फिल्मसाठी रियाची अभिनेत्री म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र सुशांतचा मृत्यू आणि सध्याची परिस्थिती पाहता आता तिला आम्ही या चित्रपटात घेणार नाही, असं लोम हर्ष यांनी स्पष्ट केलं आहे.