मुंबई, 18 ऑगस्ट : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधून अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहे. त्यातच संजय दत्त याला कोरोनाची चाचणी करताना तपासादरम्यान त्याला फुप्फुसाचा कर्करोग असल्याची बाब समोर आली. त्याने स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली.
यानंतर बॉलिवूडमध्ये सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी तो रुग्णालयात काही तपासण्यांसाठी गेला होता. त्यानंतर आता संजय दत्त कोकिलाबेन रुग्णालयासाठी रवाना होत आहे. संजय दत्तने ट्विट करुन याबाबत माहिती दिली. यावेळी त्याने आपल्या चाहत्यांना विनंती केली आहे. संजय दत्तने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की माझ्यासाठी प्रार्थना करा. यावेळी फोटोमध्ये त्याची पत्नी मान्यताही दिसत आहे.
Mumbai: Actor Sanjay Dutt leaves from his residence for Kokilaben Hospital. He says, "Pray for me." (Earlier visuals)
He was diagnosed with lung cancer last week. pic.twitter.com/4gp8twQPxE — ANI (@ANI) August 18, 2020
काही दिवसांपूर्वी संजय दत्त याने सोशल मीडियावर त्याला फुप्फुसाचा कॅन्सर असल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी मुंबईत लीलावती रुग्णालयात दाखल झालेल्या संजय दत्तला कॅन्सर असल्याचं निदान झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याला Lung Cancer असून तो चौथ्या स्टेजवर असल्याची माहिती समोर आली आहे. संजय दत्त याला अमेरिकेला हलविण्यात येणार असल्याची चर्चा होती. दरम्यान संजय दत्तची पत्नी मान्यताच संजय दत्तच्या आजाराबाबत सोशल मीडियावर व्यक्त झाली होती.
संजय दत्त आणि परिवारासाठी हा कठीण काळ आहे. याआधीही संजय आणि त्याच्या परिवाराने कठीण प्रसंगाशी सामना केला आहे. संजयने नेहमी या परिस्थितीशी धैर्याने सामना केला आहे. हा काळ देखील निघून जाईल, संजयला देवाने पुन्हा एकदा एका परीक्षेसाठी निवडले आहे आणि यामध्ये संजय जिंकेल, अशी भावना तिने व्यक्त केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Sanjay dutt