सुट्टी कसली घेता? झेपत नसेल तर खुर्ची सोडा, निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

सुट्टी कसली घेता? झेपत नसेल तर खुर्ची सोडा, निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

'आत्ता पर्यंत 6 मुख्यमंत्री बघितले पण त्या पदावर असताना त्यांनी सुट्टी घेतलेली आठवत नाही. जवळपास 3 महिने झाले आणि उद्धव ठाकरे 3 दिवस सुट्टीवर.'

  • Share this:

मुंबई 01 फेब्रुवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजपासून सहकुटुंब महाबळेश्वरमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांचा हा 3 दिवसांचा खासगी दौरा असल्याचं सांगितलं जातेय. या दौऱ्यात ते महाबळेश्वरच्या विकासासासंदर्भात एक बैठकही घेणार आहेत. या दौऱ्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. ट्विटरवरून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागून नव्या वादाला तोंड फोडलंय. ते म्हणाले, मी 1995 पासून ते 2019 पर्यंत 6 मुख्यमंत्री बघितले पण त्या पदावर असताना त्यांनी सुट्टी घेतलेली आठवत नाही. जवळपास 3 महिने झाले आणि उद्धव ठाकरे 3 दिवस सुट्टीवर. काय मोठा पराक्रम केला ह्या तीन महिन्यात की ह्यांना सुट्टी घ्यावी लागली. झेपत नसेल तर खुर्ची खाली करा असं राणेंनी म्हटलं आहे.

या आधीही निलेश राणे यांनी अतिशय शेलक्या शब्दात शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केलीय. आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही सरकारी पदावर काम केलेलं नव्हतं. विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय समिकरणांमध्ये त्यांच्याकडे महाविकास आघाडीचं नेतृत्व करण्याची संधी चालून आली आणि ठाकरे घराण्याच्या पहिल्या व्यक्तिने पद स्वीकारलं. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा ताण-तणाव झेपेल का अशीही शंका व्यक्त केली जात होती.

निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मात्र कौतुक केलंय. राज्यात पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त काम करत असल्याचंही राणे यांनी म्हटलं आहे.

मिनी काश्मीर म्हणुन ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये मुख्यमंत्री उद्भव ठाकरे हे तीन दिवसाच्या खाजगी दौर्‍यावर जातायेत. त्यासाठी महाबळेश्वर मधील वेण्णा लेक परिसरात हॅलिपॅड बनविण्यात आले असुन मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात ठेवण्यात आला आहे.

आता ठाकरे सरकार आणणार मुस्लीम आरक्षण; अस्लम शेख यांनी सांगितला अजेंडा

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी महाबळेश्वर मध्ये फ्लेक्स लावण्यात आले असून स्वागताची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री तीन दिवस सहकुटुंब महाबळेश्वर येथील राजभवन येथे वास्तव्य करणार आहेत. या दरम्यान महाबळेश्वर येथील एका लग्नसोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा हा पुर्ण खाजगी दौरा असुन राजकीय व्यक्ती आणि मिडियाला भेटण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. महाबळेश्वर मध्ये मुख्यमंत्री येणार असल्यामुळे वेण्णा लेक, घोडा रपेट मैदान हा परिसर पूर्ण बंद ठेवण्यात आला आहे.

VIDEO भाजपचे प्रवक्ते म्हणतात, 'साध्वी मूर्ख! त्या आमच्या पक्षात हे दुर्दैव'

मुळात कलाप्रेमी असलेल्या उद्धव ठाकरे यांना देश विदेशात फिरायला आवडतं. ते दरवर्षी विदेशात फिरायला जात असतात. राजकारणाच्या धबडग्यातून वेळ काढत ते जंगलातही फोटोशूटसाठी जात असतात. त्यांनी काढलेल्या फोटोंची पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत.

निसर्ग, जंगल, वन्यप्राणी हे त्यांच्या खास आवडीचे विषय आहेत. आदित्य ठाकरे यांनीही पर्यावरणावरच्या प्रेमापोटी खास पर्यावरण मंत्रालय मागून घेतलं होतं. तर तेजस ठाकरे यांनी खेकड्याच्या अनेक नव्या प्रजाती शोधून काढल्या आहेत.

First published: February 1, 2020, 8:59 AM IST

ताज्या बातम्या