मुंबई, 31 जानेवारी : 'त्या साध्वी मूर्ख आहेत. दुर्दैव आहे आमचं त्या आमच्या पक्षात आहेत', असं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी केलं आहे. News18 Lokmat वर 'बेधडक' या कार्यक्रमात चर्चेदरम्यान मधू चव्हाण बोलत होते. 'गांधींचा मारेकरी हिंदूच', असं उर्मिला मातोंडकर पुण्याच्या CAA विरोधातल्या सभेदरम्यान म्हणाल्या होत्या. याविषयी चर्चा सुरू असताना भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा उल्लेख आल्यावर चव्हाण यांनी त्या आमच्या पक्षात आहेत, हेच दुर्दैव असल्याचं म्हटलं.
उर्मिला मातोंडकर यांनी गुरुवारी (30 जानेवारी) पुण्यात CAA विरोधात बोलताना सुधारित नागरिकत्व कायद्याची (CAA) तुलना रॉलेट कायद्याशी केली होती. CAA रौलेट अॅक्टशी तुलना योग्य आहे का? याविषयी चर्चा सुरू असताना साध्वींचा विषय निघाला होता. त्यावर भाजपच्या प्रवक्त्यांनी असा पवित्रा घेतला.
'ब्रिटीशकालीन भारतात रॉलेट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जायचा. CAA सुद्धा काळा कायदा आहे', असं उर्मिला मातोंडकर पुण्याच्या सभेत म्हणाल्या होत्या. या सगळ्यावर News18 Lokmat वर चर्चा सुरू असताना भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर मधू चव्हाण यांनी भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविषयी असे उद्गार काढले.
"गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. कोणत्याही गुन्हेगारांची जात, धर्म काढणं अयोग्य आहे. गोडसे खुनी होता. त्यांनी गांधीजींचा खून केला, हेच खरं आहे. तो हिंदू होता की, मुस्लीम याचा विचार करणं गैर आहे. CAA विरोधात खोटा प्रचार सुरू आहे. तो मुस्लीमविरोधी कायदा असल्याचं सांगितलं जात आहे पण ते खरं नाही", असं चव्हाण म्हणाले.
'त्या साध्वी मूर्ख आहेत. दुर्दैव आहे आमचं त्या आमच्या पक्षात आहेत', असं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी केलं आहे. News18 Lokmat वर चर्चेदरम्यान साध्वी प्रज्ञासिंह यांच्याबद्दल चव्हाण बोलत होते. pic.twitter.com/u7k5U3T9TU
— News18Lokmat (@News18lokmat) January 31, 2020
उर्मिला मातोंडकर यांनी हा कायदा गरिबांच्या विरोधात आहे, असं म्हणाल्या. त्यावर उत्तर देताना महाराष्ट्राचे भाजप प्रवक्ते मधू चव्हाण म्हणाले, "निर्वासितांना नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. कुणाचं नागरिकत्व काढून घेण्याचा हा कायदा नाही. अपप्रचार का करतात? मुस्लीम शब्द या कायद्यात नाही."
नथुराम हिंदू होता, पण तो खुनी होता. गुन्हेगाराला जात -धर्म नसतो. ती प्रवृत्ती असते. नथुराम हिंदू आहे असं म्हणायचं कारण काय? उर्मिला यांना त्यांच्या पतीने सांगितलं का असं म्हणायला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.