मराठी बातम्या /बातम्या /करिअर /सावधान! एक चूक आणि तुमचं संपूर्ण करिअर येईल धोक्यात; तुम्हालाही 'या' वाईट सवयी नाहीत ना? करा चेक

सावधान! एक चूक आणि तुमचं संपूर्ण करिअर येईल धोक्यात; तुम्हालाही 'या' वाईट सवयी नाहीत ना? करा चेक

या सवयी तुम्हालाही असतील तर आताच सावध व्हा

या सवयी तुम्हालाही असतील तर आताच सावध व्हा

या सवयी जर तुम्हालाही असतील तर तुमचं करिअर धोक्यात (Career in danger) येऊ शकतं. इतकंच नाही तर तुम्हाला नोकरी गमवावी लागू शकते.

मुंबई, 23 मे: आजकालच्या काळात जॉब (Latest jobs) मिळणं अतिशय कठीण झालं आहे. त्यात कंपन्याही त्यांचे कर्मचारी निरखून आणि पारखून घेत आहेत. मात्र जॉब लागल्यानंतर तो जॉब टिकवणं आणि त्या क्षेत्रात सतत प्रगती (Success in job) करत राहणं आपल्या हातात आहे. एखाद्या ठिकाणी जॉब लागला की तिथल्या माणसांशी आणि वरिष्ठांशी जुळवून घेणं महत्त्वाचं आहे. मात्र अनेकांना जॉब करताना वागण्या बोलण्यातील काही वाईट सवयी (Bad habits during Job) असतात. या सवयी जर तुम्हालाही असतील तर तुमचं करिअर धोक्यात (Career in danger) येऊ शकतं. इतकंच नाही तर तुम्हाला नोकरी गमवावी लागू शकते. म्हणूनच या सवयी तुम्हालाही असतील तर आताच सावध व्हा आणि बदल करा.

उद्धट ई-मेल लिहिणे

काही लोक ऑफिशिअल ईमेल (Official Email) पाठवताना SMS ची भाषा वापरतात त्यामुळे तुम्ही प्रोफेशनल (Professional Email) नाही असं समोरील व्यक्तीच्या लक्षात येतं. काही लोक शब्दलेखन चुकीचं करतात त्यामुळे क्लायंटवर (Client) चांगलं इम्प्रेशन पडत नाही. यामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात. असंच सुरु राहिलं तर तुम्हाला नोकरीही गमवावी लागू शकते.

Career Tips: परीक्षेत कमी मार्क्स मिळाले म्हणून टेन्शन घेऊ नका; 'या' क्षेत्रांमध्ये भरघोस कमाईची संधी; वाचा सविस्तर

ऑफिसमध्ये गॉसिप करणे

काही लोकांना ऑफिसमध्ये गॉसिप्स (Gossips in Office) करायला खूप आवडतं. पर्सनल गोष्टी दुसऱ्यांना सांगायला यांना मजा येते. असा लोकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील फरक माहित नसतो आणि त्यामुळे ते कधीकधी ते अडचणीत सापडतात. म्हणून ऑफिसमध्ये कोणाबद्दल बोलणं किंवा कोणाच्या वैयक्तिक गोष्टी करणं बंद करा.

ऑफिसमध्ये टाईमपास करणे

काही लोक ऑफिसमध्ये टाईमपास (Time pass) या नावानं प्रसिद्ध असत. वेळ घालवण्यासाठी असे लोक काहीही करू शकतात. काम पुढे ढकलणं हा त्यांचा स्वभाव असतो. असे लोक केवळ आपला वेळ वाया घालवत नाहीत तर ते दुसऱ्यांसोबत बसून त्यांना काम करु देत नाहीत.

Study Abroad: परदेशात शिक्षणासाठी कोणत्या देशात कुठले कोर्सेस आहेत उत्तम; वाचा

कंपनीला वाईट बोलणे

काही लोकांना उगाच इतरांना नावं ठेवणायची सवय असते. अशा सवयीमुळे ते इतरांनाही आपल्यात सामील करून घेतात. बॉसला किंवा ऑफिसला नावं ठेवण्यामुळे तुमचा प्रभाव कमी होऊ शकतो. तसंच तुमची नोकरीही जाऊ शकते. त्यामुळे ऑफिस आवडत नसेल तर नोकरी बदला मात्र ऑफिसला विनाकारण नावं ठेऊ नका.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Jobs Exams