Home /News /mumbai /

शिवसेनेला झटका, एकनाथ शिंदे गटनेता, भरत गोगावले प्रतोद, 37 बंडखोर आमदारांच्या सह्या

शिवसेनेला झटका, एकनाथ शिंदे गटनेता, भरत गोगावले प्रतोद, 37 बंडखोर आमदारांच्या सह्या

शिवसेना नेते एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना घटक पक्षाची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना विधिमंडळ गटनेते पदी एकनाथ शिंदे आणि प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आलीय.

मुंबई, 23 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना घटक पक्षाची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना विधिमंडळ गटनेते पदी एकनाथ शिंदे आणि प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आलीय. या बैठकीचा अहवाल पत्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विधान परीषद अध्यक्ष रमराजे निंबाळकर यांना पाठवलं आहे. शिवसेनेच्या या नव्या घटक पक्षाच्या अधिकृत पत्रावर शिवसेनेच्या 37 आमदारांच्या सह्या आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेने बंडखोर आमदारांपैकी 12 जणांची आमदारची रद्द करा अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. यासंदर्भात कायदेशीर पिटीशन दाखल केल्याचंही शिवसेना नेत्यांकडून सांगितलं जात आहे. पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत गैरहजर आणि व्हिप काढला असताने न आल्याचं कारण देत शिवसेनेने 12 आमदारांविरोधात कारवाई केली आहे. मात्र ही प्रक्रिया इतकी सोपी नाही. याबाबत तक्रार केल्यानंतर प्रत्येक आमदाराला स्वत:ची बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात येईल. या प्रकरणात आमदाराच्या वागणुकीकडेही लक्ष दिलं जाईल. सर्व पुरावे पाहिल्यानंतर अध्यक्ष यावर निर्णय घेतली, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. 'या' नेत्यांची आमदारकी रद्द करा - शिवसेना एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार यामिनी जाधव संजय शिरसाठ बालाजी किणीकर तानाजी सावंत संदिपाम भुमरे भारत गोगावले लता सोनावणे अनिल बाबर महेश शिंदे प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदेंचा ट्विटरवरुन इशारा दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेला ट्विटरवरुन प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. "कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत", असं एकनाथ शिंदे म्हणाले. "12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत", असंदेखील ते म्हणाले. "आम्ही कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे", असं शिंदे म्हणाले.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Eknath Shinde, Shiv sena

पुढील बातम्या